पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/314

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहेत. असा संशय निर्माण करण्यास बस आहेत. मुंबईत पाकिस्तानविरुद्ध लढाई सुरू झाली असेल तर असा मनुष्य मुख्यमंत्रिपदी राहणे देशाच्या दृष्टीने धोक्याचे आहे.
 शरद पवार नजरबंदीत पाहिजेत
 युद्धकाळात शत्रूशी हातमिळवणी केल्याचा संशय ही मोठी गंभीर बाब मानली जाते. काश्मीर प्रकरणात शेख अब्दुल्लांना बडतर्फ करण्यात आले. एवढेच नव्हे तर सतरा वर्षे अटकेत ठेवण्यात आले. त्यांच्याविरुद्धचा साक्षीपुरावा शरद पवारांच्या विरुद्धच्या तुलनेने अगदीच किरकोळ होता. राम नायकांच्या खुनानंतर शेख अब्दुल्लांप्रमाणेच शरद पवारांवर बडतर्फी आणि नजरबंदी अशी कारवाई झाली नाही तर निष्कर्ष एवढाच निघेल : 'पाकिस्तानी हात' हा सारा बकवास तरी आहे किंवा केंद्र सरकारची मुसलमान आणि शीख बहुसंख्य राज्यातील नीती वेगळी आणि हिंदू राज्यातील नीती वेगळी आहे.

(१५ सप्टेंबर १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३१५