पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/313

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घडवीत आहेत. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारभारात त्यांचे अनेक देशांशी संबंध असतात. त्याबरोबर पाकिस्तानशीही असणार हे उघड आहे. तेवढाच धागा पकडून त्यांच्या कारवायांमागे 'पाकिस्तानी हात' आहे असा गिल्ला करून भागायचे नाही. मोकळे होण्यासाठी पाकिस्तानी हाताचा उपयोग देशाच्या संरक्षणासाठी घातक ठरेल.
 सरकारच्या निष्क्रियतेचा दुसरा भयानक अर्थ असा लागू शकतो, की पंजाबमध्ये शीख आहेत. काश्मीरमध्ये मुसलमान आहेत. म्हणून सरकारने लष्करी कारवाई केली, हिंदू मुंबईत सरकारचे तर्कशास्त्र काही वेगळेच आहे.
 संशयाच्या सावटाखालील मुख्यमंत्री
 'पाकिस्तानी हाता'चा सरकारी आरोप गंभीरपणे केला जात नाही. याविषयी आणखी एक निर्णायक भरभक्कम पुरावा आहे, युद्ध आघाडीवरील प्रदेशातील कारभार, शत्रूशी सहमत असल्याच्या संशयाचा किंचित वास असलेल्या माणसाच्या हाती कधी ठेवला जात नाही. मुंबईत शरद पवार यांना मुख्यमंत्रिपदी राहू दिले जाते तोपर्यंत मुंबईतील घातपातात पाकिस्तानी हात असल्याचा दावा निव्वळ कांगावा मानावा लागेल.

 खैरनारांनी दाऊद इब्राहिम आदींच्या टोळ्यांशी शरद पवारांचे संबंध असल्याचा आरोप उघडपणे केला आहे. उल्हास जोशी या पोलिस अधिकाऱ्याने अशाच अर्थाचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. सगळे आरोप आपण कोर्टात खोडून काढू असे मुख्यमंत्री विश्वासपूर्वक म्हणत आहेत त्यात कदाचित तथ्य असेलही. शरद पवार न्यायालयासमोर दोषी साबीत होतील किंवा नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही, ते दोषी सिद्ध होण्याइतका साक्षीपुरावा पुढे आला किंवा नाही हाही प्रश्न महत्त्वाचा नाही. फार मोठ्या प्रमाणात सर्वसाधारण जनतेत शरद पवारांबद्दल संशय निर्माण झाला आहे, हे न नाकारण्यासारखे सत्य आहे. पाकिस्तान ज्या पंचमस्तभीयांचा वापर उत्पात घडवण्याकरिता करीत आहे. त्यांतील म्होरके ठाकूर-कलानी यांचा संबंध मुख्यमंत्र्यांशी होता. ते पकडले गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय केले हे महत्त्वाचे नाही; पण वर्षानुवर्षे ठाकूर- कलानी हे काँग्रेस आमदार गुंडांना सामील आहेत याचा सुगावा मुख्यमंत्र्यांना लागला नाही हाच मामला भरपूर गंभीर आहे. टोळीयुद्धातील दोन मारेकरी संरक्षणमंत्र्यांच्या विमानातून लखनौ-मुंबई प्रवास करतात, एवढी एकच गोष्ट संशयाचे सावट दाट करण्यास पुरेशी आहे. ठाकूर-कलानी आणि हे मारेकरी ही प्रकरणे शरद पवार अकार्यक्षम तरी आहेत किंवा सरळ गुंडांना सामील

अन्वयार्थ - एक / ३१४