पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/272

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटाघाटी चालू होत्या. मालकी आणि व्यवस्थापन बदलले तरी कामगारांचा प्रश्न सुटत नसेल तर कंपनीचा व्यवहार येणे अशक्य आहे हे उघड होते. वाटाघाटी रेंगाळत राहिल्या.
 कामगारांचा संप सुरू झाला. कारखान्याचा तोटा १५ कोटींच्या वर गेला. तो पुढे चालवणे अशक्य झाले; पण कारखाना तोट्यात चालतो म्हणून तो बंद करण्याचे स्वातंत्र्य हिंदुस्थानातील उद्योजकांना नाही. त्यांना आपले प्रकरण औद्यागिक आणि वित्तीय पुनर्बाधणी मंडळा (BIFR)कडे न्यावे लागले.
 अगदी अलीकडे मंडळाने 'पॉयशाचा' कारभार टाटांकडे देण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. टाटा करीत असलेली गुंतवणूक त्यांना मिळणाऱ्या फायद्याच्या तुलनेने कमी आहे. या कारणास्तव प्रस्ताव फेटाळला गेला.
 कामगारांच्या बोजापेक्षा मरण पत्करले
 पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात जमिनी आणि इमारती अक्षरशः सोन्याच्या किमतीने विकल्या जातात; पण एखाद्या इमारतीत जुने भाडेकरू राहात असले तर मोकळा ताबा मिळणे अशक्य होते आणि मालमत्ता मातीमोलानेसुद्धा विकत घ्यायला कोणी तयार होत नाही. तशीच स्थिती 'पॉयशा' कंपनीची झाली आहे. कामगारांना कमी करता येत नाही तोपर्यंत फायद्याची शक्यता नाही. अर्थात कंपनीची खरेदी किमत कागदोपत्री असावी त्यापेक्षा कमीच मिळणार.
 मंडळाचा निर्णय आला आणि टाटा कंपनीने गुंतवणूक वाढवण्याची आपली तयारी नाही; 'पॉयशा कंपनी' विकत घेण्यात आपल्याला काहीही स्वारस्य नाही, असे जाहीर करून टाकले. एका बाजूला कामगार दुसऱ्या बाजूला सरकार, तिसऱ्या बाजूला बुडती बाजारपेठ आणि चौथ्या बाजूला टाटा कंपनीची व्यावहारिक निष्ठुरता. चारी बाजूंनी वेढल्या गेलेल्या ३९ वर्षांच्या अजय कपाडियाला दुसरा काही मार्ग दिसेना. घरी जाऊन ६ व्या मजल्याच्या खिडकीवर चढून त्याने स्वतःला झोकून दिले आणि स्वतःपुरता तरी सगळ्या चिंतांचा अंत केला.
 अजय साधासुधा माणूस असावा. कंपनी संकटातून सोडण्यासाठी त्याला दुसरे मार्ग हाताळता आले असते.
 खटावांचे वेगळे खटले

 सुनीत खटाव आणखी एक सुप्रसिद्ध उद्योगपती. घरोघर सुपरिचित असलेल्या खटाव वायल्सच्या गिरणीचा मालक. मुंबईतील सर्वच कापडगिरण्या आजारी होऊन अर्धशतक उलटले. जुनी यंत्रसामुग्री, पुराणे तंत्रज्ञान, यंत्रमार्गांची स्पर्धा, कृत्रिम धाग्यांचे आक्रमण आणि कामगारांची मंजुरी, बोनस इत्यादीचा वाढता

अन्वयार्थ - एक / २७३