पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/271

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



तोट्यात चालणारे कारखाने आणि कारखानदार


 रोघर डास-ढेकूण मारण्याकरिता औषधाची फवारणी एका साध्या टीनच्या हातपंपाने होते. दोन पिढ्या तरी हा पंप, उत्पादक कंपनीच्या पॉयशा या नावाने ओळखला जातो.
 हिंदुस्थानातील 'पॉयशा' कंपनीचे प्रमुख अजय कपाडिया यांनी ८ मे रोजी चर्चगेटजवळील त्यांच्या सहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली.
 अजयचे वय फक्त ३९ वर्षे. घरी बायको आणि एक मुलगी. पैसा, सत्ता, तारुण्य कशाची ददात म्हणन नसलेल्या अजयने आत्महत्या का केली? 'पॉयशा' कंपनीची आर्थिक स्थिती नव्या जमान्यात मोठी कठीण झाली आहे. एकेकाळी घरगुती वापरासाठी हातपंपाला पर्यायय नव्हता. आता त्याच कामासाठी उदबत्त्या इलेक्ट्रिक तबकड्या, फवारे डबे, अनेक साधने बाजारात आली आहेत. त्यामुळे पॉयशा पंपाची मागणी घसरली, फायदा संपला. धंदा तोट्यात आला. यंत्रसामुग्री बदलून काही नवा माल बाजारात आणणे आणि अनावश्यक कामगारांवरील खर्च कमी करणे एवढ्या एका मार्गानेच 'पॉयशा' कंपनीचे आजारीपण दूर करता आले असते.
 अशा अवघड काळी डॉ. दत्ता सामंत यांच्या युनियनने ठाण्याच्या 'पॉयशा' कारखान्यात संप चालू केला. हे एका अर्थाने कंपनीच्या पथ्यावर पडले. मंदीत संप होणे म्हणजे बुडत्या कारखानदारांना काडीचा आधारच; पण कामगारांच्या संपाचा दुसरा एक मोठा अनिष्ट परिणाम झाला.
 टाटांचा प्रस्ताव फेटाळला

 'पॉयशा' कंपनीतील कपाडियांच्या हातातील २९% भाग-भांडवल विकत घेण्याची तयारी टाटांच्या टीप्लेट कंपनीने दाखवली होती. देवाणघेवाणीच्या

अन्वयार्थ - एक / २७२