पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/266

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



फटक्यांच्या शिक्षेतील माणुसकी


 सिंगापूर एक स्वतंत्र श्रीमंत राष्ट्र मानले जाते. याचा आकार मुबई शहराएवढासुद्धा नाही. मलेशिया स्वतंत्र झाला, त्यानंतर सिंगापूर मलेशियातून वेगळे झाले, कोणताही भांडणतंटा न करता सामोपचाराने वेगळे झाले.
 काही अजागळ सिद्धांत अनुसरण्याऐवजी हा चिमुकला देश सरळ कामाला लागला. स्वस्त मजुरीचा फायदा घेऊन श्रीमंत राष्ट्रांना लागणाऱ्या वस्तू आणि सुटे भाग स्वस्तात पुरवण्याची कारखानदारी सुरू झाली. आज इलेक्ट्रॉनिक आणि इतर काही क्षेत्रांत सिंगापूरमध्ये तयार झालेल्या मालावर अमेरिकन कारखानदारीसुद्धा अवलंबून राहते.
 दोन महिन्यांपूर्वी या चिमुरड्या सिंगापूरचे पंतप्रधान आपल्या देशात भेट देण्यासाठी आले तेव्हा सारे पुढारी, कारखानदार इत्यादी मंडळी त्यांच्या अवतीभोवती नुसती आदाब घालत होती. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी चांगल्या परखड शब्दांत त्यांना काही हिताच्या गोष्टी सांगितल्या आणि ते मोठे कडक आहेत. मादके बाळगणे हा मृत्यूदंडपात्र गुन्हा आहे. रस्त्यावरती थुंकले तरी प्रचंड दंड होतो. इकडे तिकडे घाण करणे याकरिता फटक्यांच्या शिक्षेचीही तरतूद आहे.

 कायदा पुस्तकी दाखल होऊन बराच काळ झाला. वर्षाला पाचएकशे माणसांना फटक्यांची शिक्षा होते. सिंगापूरच्या रहिवाशांपैकी कोणाला फटक्यांची शिक्षा देण्याची फारशी वेळ येत नाही. मायकेल फे हा विशीतील अमेरिकन तरुण. सिंगापूर भेटीसाठी गेला आणि पुरे १० दिवस त्याने रस्त्यावर मोठा धुमाकूळ घातला. रंगाचे फव्वारे डबे घेऊन बाजूस उभ्या असलेल्या मोटारगाड्या वेड्यावाकड्या रंगवून टाकल्या. पोलिसांनी फेला पकडले. कोर्टापुढे उभे केले. त्याला चार महिने कैद, ७० हजार रुपये दंड आणि वर सहा फटक्यांची शिक्षा

अन्वयार्थ – एक / २६७