पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/262

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळालेल्या ऐतिहासिक नावाचा राग का करावा? 'तुमच्या महाराचा मी महार' असे चोखोबांनी म्हटले; मग 'महार' म्हणून ओळखले जाण्यात अपमान तो काय आहे? मांग-चांभार ही व्यवसायांची नावे आहेत, त्या नावात वाईट काहीच नाही; त्या व्यवसायांना हीनता आली म्हणून ती नावे हीन बनली; पण, महार समाजाची कलाकार म्हणून कीर्तीही आहे. ब्रिटिश फौजेत महार बटालियनची शौर्याची कामगिरी मोठी सन्मानली जात असे. मग केवळ मराठी वाक्प्रचार वापरला गेला तर त्यात दुखावले जाण्याचे काही कारण नाही. 'फुकटची म्हारकी करायला लागणे' या वाक्प्रचारातल्या जातीचा उपमर्द नाही, उलट तिच्यावर होणाऱ्या घनघोर अन्यायाची जाणीव दाखविली आहे; अशा वाक्प्रचारांना तरी विरोध असू नये. महारांनी 'महार' अभिमानाने म्हणवून घेतले पाहिजे; सवर्णांनाच आपल्या जातीचे नाव सांगायला शरम वाटली पाहिजे. इ. इ. त्या तरुणाला पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ.
 राजवाड्याचे रहस्य
 शेतीमालाच्या भावाचा लढा हाती घेऊन निघालो असता दुसऱ्या कोणत्याही मुद्यावर लक्ष विचलित होऊ देणे मला परवडण्यासारखे नसल्याने तो विषय मी सोडून दिला. दुसऱ्या एका सभेत पूर्वानुभवाने शहाणा झाल्यामुळे 'हरिजन' हा महात्माजींनी प्रचारात आणलेला शब्द वापरला. तेथेही विरोध करण्यासाठी एक तरुण भेटायला आला. महाराष्ट्रभर गावोगावी वेशीबाहेरच्या समाजात माझ्याविषयी मोठे प्रेम आहे. बहुतेक गावांत मी गेलो म्हणजे तेथील स्त्रिया प्रथम ओवाळायला येतात. त्यामुळे नामाभिधानाचा हा प्रश्न नाममात्रच त्रास देऊन गेला. महार एके काळी राज्यकर्ते होते; त्यामुळे गावोगावच्या त्यांच्या वस्तीस 'राजवाडा' म्हणतात. याचा उपयोग करून घेऊन 'गावठाण-राजवाडा' ऐक्याच्या कार्यक्रमात वेशीबाहेरील समाजाला नाव देण्याचे कुशलतेने टाळण्यात आले.
 ल्यबन्त का कभूधावि?

 महाराष्ट्रात बहिष्कृत समाजाचा प्रश्न श्री. म. माटे यांनी फार चिकाटीने हाताळला. परंपरागत रूढ शब्द 'अस्पृश्य' म्हणजे स्पर्श करण्यास अयोग्य अशा अर्थाचा होता. माट्यांनी 'अस्पृष्ट' म्हणजे आजपावेतो स्पर्श न झालेला असा शब्द आग्रहाने वापरला; पण दुसऱ्या कुणीच माट्यांचा शब्द उचलला नाही. कारण 'अस्पृष्ट' शब्द यथार्थ नव्हताच. शिवाशिवीचे प्रकरण पूर्णपणे कडकपणे पाळण्याचे दिवस केव्हाचं संपलेले होते; एका सबंध समाजाला स्पर्श न झालेले असे म्हणणेही चुकीचे होते. त्यांना स्पर्श झाला नसेल तर तो

अन्वयार्थ - एक / २६३