पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/260

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तत्त्वज्ञान करणारे डंकेलविरोधक दोन वर्षांत 'आंतरराष्ट्रीयवादी' बनणार आहेत आणि वस्तू व सेवांच्या खुल्या देवघेवीपेक्षाही माणसांची खुली ये-जा जास्त महत्त्वाची आहे असे मांडताना दिसणार आहेत. १५ एप्रिल १९९४ पर्यंत आपल्या देशाच्या सरहद्दी मजबूत राहिल्या पाहिजेत असे म्हणणारे त्या भिंतीतून पलीकडे निसटण्याची शक्यता दिसताच आपले झेंडेही बदलणार आहेत आणि घोषणाही बदलणार आहेत. खुल्या व्यवस्थेची कुचेष्टा करणारे एका रात्रीत 'आंतरराष्ट्रीयवादी' बनणार आहेत, हे माझे भाकीत आहे.

(१२ मे १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २६१