पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/256

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



खुल्या व्यवस्थेची टिंगल करणारे भोंगळ राष्ट्रवादी


 डंकेल प्रस्तावाचे प्रकरण खूप गाजून गेले. करारावर सह्या झाल्या तेव्हा खरे म्हटले तर वाद संपायला पाहिजे होता; औपचारिक कार्यक्रम अजून व्हायचा आहे असे सांगून डंकेलविरोधक अजूनही आरडाओरडा करीत आहेत. असा आरडोओरडा करण्यात कुणाला आनंद वाटत असेल तर तो त्यांना उपभोगू द्यावा. त्यांच्या सुखात व्यत्यय कोणी का म्हणून आणावा? शिमगा संपला तरी कवित्व चालू राहणारच.
 एखादा सिनेमा गाजला, की त्या सिनेमाच्याच नावाने चित्रपट भाग-२, काढला जातो. 'गॉडफादर' सिनेमा गाजला तेव्हा 'गॉडफादर - २' निघाला. पूर्वपुण्याईने तोही बरा चालला, मग 'गॉडफादर भाग-३' निघाला. डंकेल प्रकरण इतके गाजले, की त्याचा भाग-२ निघावा हे साहजिकच आहे. डंकेल साहेब गॅटच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले, त्यांच्या जागी सुदरलँड साहेब आले, तेही दोनचार वर्षांत निवृत्त होऊन जातील. या प्रकरणाचा दुसरा भाग कुणाच्याही लेखणीने लिहिला गेला, तरी त्याचे नाव डंकेल भाग-२ म्हणूनच गाजावे!
 आता प्रश्न माणसांच्या देवघेवीचा

 डंकेल प्रस्तावात चर्चा झाली ती जागतिक व्यापार, विशेषतः शेतीमालाचा व्यापार खुला करण्याची, राष्ट्राराष्ट्रातील गुंतवणूक सुलभ करण्याची, सेवासंस्था परस्परांच्या भूमीवर उभ्या करण्याची आणि बौद्धिक संपदेच्या क्षेत्रातील चोरबाजार बंद करण्याची. दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रातील भिंती दूर व्हाव्यात यासाठी चर्चाच्या फेरीवर फेरी झालेल्या आठव्या फेरीच्या मंथनातून निघालेले लोणी. नववी फेरी १९९६ मध्ये चालू होईल, ती कधी संपेल हे कसे सांगावे? संपली तर वर्षा दोनवर्षांत संपेल. लागल्या तर वर्षांच्या एकदोन पंचकड्याही लागून जातील. तिची अंमलबजावणी एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात कधीतरी

अन्वयार्थ - एक / २५७