पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/255

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकशाहीही हवी आहे, ते हुंब बनू शकत नाहीत, त्यांची स्वाभाविक ऋजुता आणि सौजन्य लोकशाही हक्क बजावण्याच्या आड येतात. नेहरूंपासून खालपर्यंत सर्व समाजवाद्यांचे पुतळे उखडून टाकण्याची चळवळ सर्व स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी हाती घेतली असता, स्वातंत्र्याच्या विरोधकांना खडसावले असते तर लोकशाहीतही अल्पसंख्याकांच्या झुंडगिरीविरुद्ध बहुजनांचा आवाज उठू शकला असता. याउलट सामान्य माणसेही पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याप्रमाणे, "खुलेकरण आमचे ध्येय आहे; पण सरकारची कल्याणकारी कार्यक्रमांची जबाबदारी नाकारता येणार नाही." असली भाषा बोलू लागले तर हिंदुस्थानचा रशिया होण्यास फारसा अवधी लागणार नाही.

(६ मे १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २५६