पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/226

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कचाट्यात पकडून 'त्राही भगवान' करून टाकतात. 'इन्स्पेक्टर राज' नावाने ही व्यवस्था गाजली आहे; पण एक बिनसरकारी 'समांतर इन्स्पेक्टर राज' भरभक्कम प्रस्थापित झाले आहे, याची आज कल्पना आली. सेनेच्या संमतीशिवाय इकडची काडी तिकडे हलत नाही. दुकान चालवायचे असेल, सेनेला खुश ठेवायला पाहिजे. कारखाना चालवायचा असेल, सेनेकडे जा. भाडेकरू वर्षानुवर्षे जागा खाली करून देत नाही, सेनेस शरण जा. सिनेमा चालवायचा आहे, सेनेला खुश करा. कामधंदा पाहिजे असेल, सेनेकडे जा. अमेरिकेतल्या 'माफिया'चा हा देशी अवतार आहे! तेथल्याप्रमाणेच येथे खरे राज्य चालते हे 'गॉडफादर'चे, मुख्यमंत्री कोणीही असो.
 हिंदू गॉडफादरचा माफिया
 गॉडफादरने ठरवले तर कोट्यवधी रुपये खर्चुन काढलेल्या सिनेमाची रिळे खोक्यातच पडून राहतात. कोणा कलाकारावर गॉडफादरची खप्पा मर्जी झाली तर यच्चयावत कलाकृती बासनात बांधून ठेवून उपाशीपोटी फिरण्याची त्याच्यावर पाळी येते. गॉडफादरचे फर्मान निघाले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने रद्द करावे लागतात. गॉडफादरने थोडासा इशारा देण्याचा अवकाश की स्टेडियम ध्वस्त होते, पत्रकारांची पिटाई होते. गॉडफादर काय वाट्टेल ते जाहीररीत्या बोलू शकतात, मायबहिणींची, पत्रकारांची बेअब्रू करू शकतात, वर्तमानपत्रांच्या होळ्या करू शकतात, मुंबईसारखे शहर दंगे-घातपात- अत्याचार यांनी जेरीस आणू शकतात.
 जोवरी न देखील वाघमुखा
 मुख्यमंत्री काय करतात बिचारे! औरंगाबादला पत्रकारांची खुलेआम पिटाई झाली. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशी रणगर्जना मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी केली. गॉडफादरना चार दिवसांत अटक करू अशी ललकारी दिली. गॉडफादर त्यामुळे घाबरले नाहीत. त्यांनी उलट बेगुमानपणे लोकसत्ता, टाइम्ससारख्या मातब्बर वर्तमानपत्रांच्या होळ्या करण्याचे फर्मान काढले. मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांची हिंमत फक्त गॉडफादरवर खटला दाखल करण्याची झाली. तो खटला सुनावणीस यायचा कधी? त्याचा निकाल लागायचा कधी? हे गॉडफादरच जाणे!
 नागव्याला पाहणाऱ्याने लाजावे

 बाळासाहेब ठाकऱ्यांनी काहीही केले तरी त्यांना पकडण्याची किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारची हिंमत होत नाही. कारण काय? 'नंगे को खुदा

अन्वयार्थ - एक / २२७