पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/222

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेण्याची संधी पुढाऱ्यांना मिळालीच पाहिजे, या अटी सांभाळून खुलेपण आणायचे झालेच तर ते शेतीखेरीज बाकीच्या क्षेत्रात; शेतीमात्र नेहरू जमान्यातल्याप्रमाणेच पन्नासवर टक्के तोटा घेऊन चालू राहिली पाहिजे असा सरकारी हेतू आहे, याबद्दल आता शंका घेण्याचे काही कारण नाही.
 २८ फेब्रुवारी रोजी दूरदर्शवर अंदाजपत्रकी भाषण करताना दिसले ते व्यासंगी, अनुभवी, अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंग नाहीत; पंतप्रधानांची हुजरेगिरी करणारे, सर्व सिद्धांत बाजूला ठेवून पुढारी थाटाची भाषणे करणारे आणि त्यात रंग आणण्यासाठी शेरोशायरीचा वापर करणारे मनमोहनसिंग, हे मनमोहनसिंग बुटासिंगांपेक्षा काही वेगळे वाटले नाहीत.

(११ मार्च १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक । २२३