पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/210

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मध्य-पूर्वेत धुमाकूळ
 इराणमध्ये मुस्लिम कठमुल्लांचे राज्य चालू आहे. दोनच दिवसांपूर्वी इराणच्या अध्यक्षांच्या खुनाचा प्रयत्न झाला. खुनाच्या कटामागे अमेरिकेचा हात असल्याबद्दल इराणमध्ये प्रचंड निदर्शने झाली. इराकच्या सद्दाम हुसेन सरकारविरुद्ध अमेरिकेच्या आग्रहाने संयुक्त राष्ट्रसंघाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी आक्रमण केले होतेच. पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होईल अशी शक्यता वाटते.
 मध्य-पूर्वेतील इस्त्रायल हे तर अमेरिकेचे खास बंधुराष्ट्र. आजपर्यंत शेजारच्या प्रबळ अरब राष्ट्रांना तोंड देऊन इस्त्रायल उभे राहिले ते अमेरिकेच्या मदतीमुळे पण क्लिंटनच्या कुऱ्हाडीचा फटका इस्त्रायललाही बसला आहे. इस्त्रायली पंतप्रधान शेरॉन यांना पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेचे यासर अराफत यांच्याशी बोलणी करणे भाग पडले, इतकेच नव्हे तर पॅलेस्टिनी राष्ट्रास मान्यता द्यावी लागली. त्यापलीकडे जाऊन पॅलेस्टिनी निर्वासितांचे नवे राष्ट्र भरभराटीस जावे याकरिता भरकस मदत करण्याचेही मान्य करावे लागले.

 युरोपातील राष्ट्रसमुदायाशी अमेरिकेचा संघर्ष तसा जुना आहे. फ्रान्स देशाबद्दल अमेरिकी सर्वसामान्य नागरिकांच्याही मनात एक अढी आहे. आर्थिक प्रश्नाबद्दल, संरक्षण व्यवहाराबद्दल, युरोपीय देशांशी अमेरिकेचा तंटाबखेडा असावा आणि क्लिंटनच्या कुऱ्हाडीचा तडाखा त्यांनाही बसावा हे समजण्यासारखे आहे; पण रशिया आणि इतर पूर्वाश्रमीच्या समाजवादी देशांशी स्नेहाचेच नव्हे तर गोडीगुलाबीचे संबंध प्रस्थापित होणे अमेरिकेच्या आणि सर्वच जगाच्या दृष्टीने आवश्यक आहे. अध्यक्ष येलत्सिन यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचा पाठपुरावा चालवला आहे. रशियातील चलनवृद्धी आटोक्यात ठेवण्यासाठी परदेशी मदतीची गरज आहे. चार-पाच वर्षांपूर्वी डॉलरच्या बरोबर असलेला रुबल घसरत घसरत २००० रुबल्स = १डॉलर इतका कोसळला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपिय राष्ट्रांना ज्या प्रकारची आणि ज्या प्रमाणावर मदत 'मार्शल प्लॅन'खाली झाली तशीच १९९१ मध्ये जुन्या समाजवादी देशांना मिळाली असती तर खुली अर्थव्यवस्था आणण्याचे काम सोपे झाले असते; पण यावेळी नेमकी अमेरिका कंजूष झाली. पहिल्या महायुद्धानंतर वुड्रो विल्सनने केलेली चूकच क्लिंटन करीत आहेत. मदत दिली; पण आवश्यकतेपेक्षा खूपच कमी. परिणाम असा झाला, की खुली अर्थव्यवस्था रशियात मागे हटत आहे. जुन्या पुराण्या समाजवादी व्यवस्थेचे पुरस्कर्ते अधिकारपदावर पुन्हा हक्क बसवीत आहेत आणि झिरिनॉव्सकी

अन्वयार्थ - एक / २११