पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सारखा 'भस्मासुर' डोके वर काढत आहे. अशा परिस्थितीत क्लिंटन बाळाने काय करावे? रशियास भेट देऊन खुली व्यवस्था अधिक वेगाने आणणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल त्यांनी जोरदार भाषण दिले. अमेरिकेचे उपरराष्ट्रमंत्री स्ट्रोब यांनी काढलेले उद्गार फ्रेंच महाराणी ॲत्वानेतच्या "लोकांना भाकरी मिळत नसेल तर मिठाई खाऊ द्या" या कुख्यात उक्तीची बरोबरी करणारे आहेत. समाजवादातून खुल्या व्यवस्थेकडे येण्यासाठी 'धक्क्याचा उपचार' आवश्यक होता हे सर्वमान्य; पण आर्थिक अराजकाने हवालदिल झालेल्या रशियन नागरिकांना स्ट्रोब साहेबांच्या मते "आतापर्यंत ठक्त धक्काच मिळाला आहे, उपचार काहीच नाही." या एका वाक्यामुळे झिरिनॉव्सकीला प्रचंड बळ सापडले बिल क्लिंटन बाळाच्या कुऱ्हाडीने आणखीन एका झाडाचा जीव कासावीस केला.
 इंग्लंडही सुटले नाही
 इंग्लंड म्हणजे तर अमेरिकेचे सर्वांत प्रेमाचे राष्ट्र. दोन्ही राष्ट्रांतील नागरिकांना एकमेकांमध्ये फरक असा वाटतच नाही. दोन महायुद्धे आणि एक प्रदीर्घ शीतयुद्ध यांना दोघांनी मिळून तोंड दिले. चर्चिलच्या शब्दांत अमेरिका आणि इंग्लंड यांचे 'खास नाते' आहे. क्लिंटन बाळाची कुऱ्हाड खुद्द इंग्लंडवरही चालते आहे. आयर्लंडमधील अल्सटर हा उत्तरेकडील परगणा. आयरिश स्वातंत्र्यानंतरही इंग्लंडच्या आधिपत्याखाली राहिलेला तो भाग स्वतंत्र व्हावा याकरिता वर्षानुवर्षे आंदोलन चालू आहे. आयरिश अतिरेक्यांनी घातपात, खून, बॉम्बस्फोट करून इंग्लंडमधील सर्व शांतता नासवून टाकली आहे. अतिरेकी चळवळीतील 'सिनफेन' संघटनेचा नेता जेरी ॲडाम्स अनेक घातपातांच्या कृत्यांकरिता जबाबदार मानला जातो. त्याचे नाव काढताच इंग्रजांचा कपाळशूळ उठतो.
 बिल क्लिंटन सरकारने ॲडाम्सला अमेरिकेत बोलावले. एवढेच नव्हे तर सिनेटमध्ये येऊन निवेदन करण्याचे आमंत्रण दिले. जेरी ॲडाम्स अमेरिकेत गेला; त्याच्या भेटीने आणि निवेदनाने सगळी प्रसिद्धी माध्यमे भरून गेली, वातावरण इतके बदलले, की आयर्लंड प्रकरणी इंग्लंडला माघार घ्यावी लागेल, की काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. तसे घडल्यास जॉन मेजर यांचे सरकार टिकणे कठीण आहे.
 आठवावे लिंकनचे रूप

 पूर्वेला जपानपासून पश्चिमेकडे इंग्लंडपर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सगळ्या देशांना चेपीत आहेत. त्यांत मित्र आहेत, अतिप्रेमाचे मित्र आहेत आणि काही

अन्वयार्थ - एक । २१२