पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वानरराज सुग्रीव किंवा राक्षसराज बिभीषणाजवळही राहू शकतेस. जिथे तुला सुख वाटेल तेथे तू आपले मन वळीव. तुझ्यासारखी दिव्यरूपसौंदर्याने सुशोभित नारी आपल्या घरात असता रावण इतका काळ तुझ्यापासून दूर राहिला असणे शक्य नाही."
 रामाचे कठोर बोल ऐकून सीता दुःखित झाली. डोळ्यातील पाण्याने भिजलेले आपले मुख पदराने पुशीत ती हळूहळू गदगदलेल्या वाणीने म्हणाली,
 अग्निदेवाची साक्ष :
 "वीरा, तुम्ही असं कठोर अनुचित, कर्णकटू आणि रूक्ष बोल मला का ऐकवता आहात? माझ्यावर विश्वास ठेवा, मी माझ्या सदाचाराचीच शपथ घेऊन सांगते, की मी शंका घेण्यायोग्य नाही. रावणाच्या शरीराला माझ्या शरीराचा स्पर्श घडला आहे. माझं दुर्भाग्य त्याला कारणीभूत आहे. माझं अंग पराधीन होते; पण माझे हृदय सदैव तुमच्याच ठायी गुंतलेले आहे."
 "माझ्या शोधासाठी तुम्ही महावीर हनुमानाला पाठविले होते त्याच वेळी माझ्या त्याग का केला नाही? त्या वेळी हनुमानाच्या मुखातून तुम्ही मला त्यागल्याचे वृत्त ऐकले असते तर त्याच्यासमोरच मी माझ्या प्राणाचा त्याग केला असता, मग अशाप्रकारे तुमचा जीव धोक्यात घालून तुम्हाला हा युद्धाचा व्यर्थ खटाटोप करावा लागला नसता."
 रडत आणि अश्रू ढाळीत बसलेल्या लक्ष्मणाला सीता म्हणाली,
 "सुमित्रानंदन, माझ्यासाठी चिता तयार कर. माझ्या दुःखाला हेच औषध आहे."
 अग्निपरीक्षाः अग्निदेवाने स्वतःच सीतेच्या शुद्धतेची साक्ष दिली तेव्हा एकवचनी रामाने उलटे बोलायला सुरुवात केली आणि 'अग्निपरीक्षा' करणे योग्यच होते अशी मखलाशी केली.
 राम सीतेसह अयोध्येला पोचले. राज्याभिषेक झाला. सीता गर्भवती झाली, तिने तपोवनात एक रात्र निवास करण्याची इच्छा असल्याचे डोहाळे सांगितले. एवढ्यात काही गुप्तहेरांनी प्रजाजनांत सीतेच्या स्वीकाराबद्दल नाखुषी आहे अशी माहिती रामराजाला सांगितली.
 परित्यक्तासीता
 रामाने प्रत्यक्ष अग्निदेवतेच्या साक्षीपेक्षा संकुचित दृष्टीच्या काही प्रजाजनांचा अपवाद अधिक महत्त्वाचा मानला. याचा अर्थ स्पष्ट आहे, की सीतेला घरी आणल्याबद्दल त्याच्या मनातही कोठेतरी रुखरुख राहिली होती. अन्यथा जनापवाद

अन्वयार्थ – एक / २२