पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






नोकरदार आख्यान-'आणिला, मागुती नेला...!'


 रकारी काम म्हटले की ते गैदी, कागद आणि लाल फिती यांचा गुंता, प्रचंड खर्च, त्या मानाने काम अगदीच कमी. सरकारी कामाच्या या खास धबडग्यात सर्वसामान्य लोकांच्या डोळ्याला पाणी येते; पण या सगळ्या विक्राळ प्रकारात नकळत का होईना, हास्याची लकेर उठावी असे प्रसंग येतातच.
 सेवकांचिया लीळा
 सरकारी कामांमध्ये गोंधळ असायचाच ही परंपरा भारतातही मोठी प्राचीन आहे. रामावतारापूर्वी नोकरदारांचा उल्लेख सापडतो, तो घरगुती सेवकांचा, म्हणजे खासगी तैनातीतील नोकरांचा. ते राजमहालात काय गोंधळ घालत असतील ते असो, त्याचा उल्लेख लेखी सापडत नाही. राजमहालातले कोठावळे चोऱ्या करीतच असणार; दासदासी नासधूस करीतच असणार यात काही शंका नाही; पण सरकारी सेवकांच्या कार्यशैलीचा पहिला उल्लेख रामायणात सापडतो. हनुमान हा पहिला सरकारी नोकर. मनापेक्षा अधिक गतीने उड्डाणे करणारा, प्रचंड ताकदीचा आणि बुद्धिमंतांतील सर्वश्रेष्ठ असा हा रामसेवक. त्याला सीतेच्या शोधार्थ रामाने पाठवले. सीतेचा शोध त्याने काढला खरा; पण त्याबरोबर सगळी लंका जाळून आला. लंकेबरोबर अशोकवन आणि अशोकवनाबरोबर सीता जळाली नाही हे नशीब!

 विनोदाचार्य चिं.वि.जोशी यांनी हनुमानाच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील इंजिनीअर पूल बांधत नाहीत, बांधलेला पूल पावसाळ्यात वाहून गेला असे दाखवतात आणि एकाच पुलाच्या बांधकामाचे अनेकदा पैसे घेतात. तसेच रामाच्या काळीसुद्धा

अन्वयार्थ - एक / २०४