पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होऊ शकतो; हिदुस्थानात उपलब्ध सर्व औषधी वनस्पती अभ्यासण्याची, त्यांची पद्धतशीर जंत्री करण्याची आणि त्यांच्याबद्दल आधुनिक संशोधन करण्याची निकडीची गरज आहे." असे पंतप्रधानांनी आग्रहाने सांगितले.
 'इंडिया' पॅथीच्या डॉक्टर शिवा
 दुसरा प्रसंग २९ डिसेंबरच्या डॉ. वंदना शिवा पर्यावरण तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. पर्यावरण तज्ज्ञांची जगात आज मोठी चहा आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीमती मेधा पाटकर यांना नोबल पारितोषिका समान समजले जाणारे एक पारितोषिक मिळाले. नोबल पारितोषिकाच्या बरोबरीची समजली जाणारी अशी पारितोषिके किती आहेत कुणास ठाऊ? डॉक्टर वंदना शिवा यांनाही तसेच एक पर्यायी नोबल पारितोषिक मिळाले आहे. त्याखेरीज पर्यावरणवादी स्त्रीमुक्ती चळवळीच्या त्या 'शिल्पकार' समजल्या जातात. डॉक्टरबाईंचे पुण्याला भाषण झाले. डंकेल प्रस्तावांत संशोधकांच्या बौद्धिक संपदेच्या हक्काला मान्यता मिळाल्यामुळे औषधांच्या किमती वाढणार आहेत. उद्योगात बहुराष्टीय कंपन्या प्रवेश करत असल्यामळे हे उद्योग जास्त नफेखारीकडे लक्ष देतील. त्यामळेच जीवनावश्यक ओषधे उत्पादित करण्याचे प्रमाण कमी होईल आणि गोरगरीब रुग्णांवरील उपचार महागडे बनतील."
 बहुराष्टीय कंपन्यांची आधुनिक ओषधे बाजारात विनाहरकत येऊ लागली आणि भारतीय कंपन्यांना त्या औषधाची नक्कल करण्यासाठी मानधन देणे भाग पडले तर त्यामुळे जीवनावश्यक औषधांचे उत्पादन का घटावे ; हे समजणे कठीण आहे; पण बाईंच्या मतांप्रमाणे भारतातील जनतेच्या सर्वसामान्य औषधोपचारासाठी परदेशात तयार होणाऱ्या अत्याधुनिक औषधांची फार मोठी गरज आहे त्यांची कल्पना स्पष्ट होते. हिदुस्थानातील कंपन्यांना विलायती औषधांचा चोरबाजार चालवण्याची मुभा असली तरच गोरगरिबांना ही औषधे स्वस्त मिळतील, अन्यथा देशात मोठा हाहाकार उडेल, अशी त्यांची मांडणी. दोन अतिविशिष्ट व्यक्ती विद्वान म्हणून जगभर गाजलेल्या वैद्यकीय उपचारपद्धतीविषयी त्यांची मते उलट टोकाची विरुद्ध म्हणून तिसऱ्या घटनेचे महत्व.
 भाजलेल्या पोराचे लोकवैद्यक

 प्रसंग घडला तो माझ्या शेतावर. दिवसभराची कामे संपल्यानंतर अंधार झाल्यावर शेतावर राहणाऱ्या एक बाई त्यांच्या चारपाच वर्षांच्या मुलाला घेऊन आल्या. पोराने अंगावर आमटीचे कढण सांडून घेतल्यामुळे मनगटापासून कोपरापर्यंतचा निम्मा भाग सगळा भाजून, सोलून निघाला होता. शेतावर

अन्वयार्थ - एक / २००