पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






विलायती औषधी महाग होणे गरिबांसाठी चांगले


 गेल्या पंधरवड्यात योगायोगाने तीन घटना घडल्या, त्यांतल्या दोन अतिविशिष्ट (VIP)व्यक्तींशी संबंधित असल्यामुळे वर्तमानपत्रांत झळकल्या; तिसरी घटना अगदी सामान्य शेतमजुराच्या पाच वर्षांच्या पोराची, माझ्या शेताबाहेर कुणाला माहीतसुद्धा नसलेली. तिन्ही घटनांचा नेमका अन्वयार्थ काय लावायचा? ते मलाही स्पष्ट समजत नाही.
 आयुर्वेदी पंतप्रधान
 २५डिसेबर १९९३-नाताळच्या दिवशी पंतप्रधान नागपूरला आले. दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमात त्यांनी ५४ व्या अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाचे उद्घाटन केले.
 "आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकातील इतर प्रणालीच्या बरोबरीने स्थान मिळावे त्यासाठी अनुभवी आयुर्वेदशास्त्र्यांनी प्रयत्न करावेत; सरकार आयुर्वेदासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्यास तयार आहे, असे संमेलनात बोलताना पंतप्रधानांनी जाहीर केले.

 "आयुर्वेद केवळ एक उपचारांची पद्धती नाही, तो आरोग्याचा सर्वंकष विचार आहे; त्याला किरकोळ स्वरूपाच्या आजारांकरिता वापरायची उपचार पद्धती असे स्वरूप येता कामा नये; औषधी वनस्पती झपाट्याने नष्ट होत आहेत, स्थानिक लोक, आदिवासी यांच्याकडून त्यांच्याविषयी मौल्यवान माहिती मिळवली पाहिजेत; औषधी वनस्पतींची पद्धतशीर लागवड झाली पाहिजे. उत्तरेत हितालय आणि दक्षिणेत नील, मलय या पर्वतांवरील विपूल औषधी वनस्पतींची ख्याती पुरातनकाळपासून आहे, त्यांची ओळख पटवून, त्यावर आधुनिक संशोधन होणे आवश्यक आहे; आदिवासी विभागातील अनेक आजार आणि साथीचे रोग आधुनिक उपचारांना दाद देत नाहीत; पण स्थानिक जडीबुटीने त्याचा उपचार

अन्वयार्थ - एक / १९९