पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



रशियात आता फॅसिझम लोकप्रिय


 शियात नव्या हिटलरचा उदय होणार अशी भीती वाटतच होती. जवळजवळ अर्धे शतक महासत्ता म्हणून मिरवलेले एक राष्ट्र सहजासहजी तिसऱ्या जगातील गरीब राष्ट्रांच्या पंगतीला जाऊन उभे राहील हे कसे शक्य आहे? प्रचंड चलनवाढीमुळे सगळी जीवनमूल्यं निकालात निघाली आणि भल्या घरच्या मुलामुलींनाही अनैतिकतेचा आधार घेतल्याखेरीज जगता येत नाही, अशी परिस्थिती तयार झाली, की त्यातून एखाद्या हिटलरच्या उदय होतोच. १९३०च्या आसपास जर्मनीत हेच घडले आणि आज रशियात पुन्हा तेच घडत आहे.
 राष्ट्राध्यक्षाच्या हाती सर्व सत्ता एकवटणारी घटना रशियन जनतेने मान्य केली आहे; पण निवडणुकांत मात्र सर्वांत मोठा पक्ष म्हणून येल्तसिन यांचा पक्ष पुढे आला नाही, बहुमत मिळाले नाही तरी सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला तो झिरिनॉव्सकी यांचा 'फॅसिस्ट' तोंडवळ्याचा पक्ष. राष्ट्राध्यक्षांच्या हाती नव्या घटनेने सोपवलेले सर्वाधिकार येल्तसि पेक्षां झिरिनॉव्सकी यांच्या उपयोगाचे होतील अशी लक्षणे आहेत.
 पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना...
 रशियाचा एकूण इतिहासच असा आहे, की लोकशाही व्यवस्था तिथे टिकणे कठीण.

 तिथल्या जमिनीत लोकशाहीचे बियाणे रुजत नाही आणि अंकुरतही नाही. समाजवादी म्हणवणारी पहिली क्रांती लोकशाही परंपरा नसलेल्या रशियात झाली म्हणून साम्यवादाला विक्राळ 'स्टॅलिनी' स्वरूप आले. शतकानुशतके झार सम्राटांच्या गुलामगिरीची परंपरा असलेल्या देशात 'नाही रेची हुकूमशाही' या कल्पनेची विटंबना झाली. 'हुकूमशाही' तेवढी राहिली. 'नाही रे' बिचारे पुन्हा गुलामच राहिले, मार्क्सच्या अनुमानाप्रमाणे पहिली समाजवादी क्रांती

अन्वयार्थ - एक / १९४