पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून सत्य बाहेर आले. भारतीय शेतकऱ्यांना सरकारी धोरणामुळे खुल्या बाजारपेठेपेक्षा ४७% कमी किमत मिळाली. भारतीय शेतकऱ्यांची सबसिडी ४७% आहे. वरखते, भ्रष्टाचार इत्यादी मार्गांनी शासनाने लादलेला बोजा लक्षात घेतला तर हिंदुस्थानातील शेतकऱ्यांची उणे सबसिडी जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा वरचढ आहे. नेहरू व्यवस्थेचे भांडे फुटले आहे. जगात सर्वांत अधिक संरक्षण कारखानदारांना आणि सर्वांत अधिक मरण शेतकऱ्यांना हा जिवघेणा खेळ शासन खेळले. त्यात कारखानदार रंगले आणि आता 'बॉम्बे क्लब' लेव्हल फील्डची मागणी करीत आहे. 'बॉम्बे क्लब'ची वंशावळी 'बॉम्बे प्लॅन'पेक्षा 'राय क्लब' अर्थात सोनेरी टोळीशी जुळलेली आहे हे अगदी उघड आहे.
 सिंड्रेलाची जुनी परीकथा नव्या आवृत्तीत आली आहे. नेहरू काळात हाल सोसलेले शेतकरी खुल्या बाजारपेठेत उतरत आहेत आणि लाडावलेले कारखानदार मात्र लेव्हल फील्डची केविलवाणी भाषा करीत आहेत.खुलेपणाची भाषा करताना महासंघाच्या नावाचा आणि संरक्षण मागताना 'बॉम्बे क्लब'चा आडोसा, असा हा 'इंडियन' कारखानदारांचा कावा आहे.

(३० डिसेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १९३