पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंदुत्वनिष्ठ शेतकरी सेना भगव्या रंगाचे डबे घेऊन देशभरच्या शेतातील उभ्या पिकांना आणि झाडांना रंगाचे नवे हात देण्याचे अभियान चालू करतील आणि सूर्यानेसुद्धा याद राखून ठेवावी. ढगांनाही सक्त ताकीद आहे. इंद्रधनुष्यातला हिरवा रंग यापुढे खपवून घेतला जाणार नाही!
 हे असे हिरव्या रंगाचे उच्चाटन सुरू झाले, की दुसरा कोणी शहाणा उठून त्याला न आवडणाऱ्या आणखी कोणा रंगाचे उच्चाटन करण्याचा कार्यक्रम आखेल आणि पृथ्वीची स्थिती दोन बायकांच्या दादल्यासारखी होईल. तरण्या बायकोने पांढरे केस उपटून काढावे आणि पहिलीने काळे. हिरव्या रंगाच्या उच्चाटनाचा हा कार्यक्रम पुढे काय काय रंग आणणार आहे आणि ठेवणार आहे ते आपण शांत बसून पाहावे, यापलीकडे आपल्या हाती तरी काय आहे?

(१६ डिसेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १८४