पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागतात, तर कधी डोळे मिटण्याची किंवा बुबुळे बाहेर पडण्याची वेळ येईपर्यंत आखूड होतात. नव्या फॅशनच्या घोषणा झाल्या, की तर्वमानपत्रात मथळे झळकतात, 'यंदाचा रंग पिवळा!' किंवा 'यंदा राज्य सुती कापडाचे', 'नायलॉनची सद्दी संपली' इ. इ.
 हिंदुस्थानातही आता द्वाही फिरली, 'हिरवा रंग चलेजाव. जेथे जेथे म्हणून हिरवा रंग दिसेल तेथे तो रंग बदलून, नवा रंग शक्यतो भगवा – देण्याकरिता शिवसैनिक आणि इतर हिंदुधर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ दंगली करू लागतील; पण या हिरवे हटाव कार्यक्रमामुळे मोठी गडबड होणार आहे.
 हिरवा सिग्नल थांबा!
 रेल्वे स्टेशनच्या खांबाला हिरवा रंग चालणार नाही म्हटले तर चालून जाईल. किंबहूना स्टेशनच्या खांबाला रंग नसण्याचीच सवय आहे; पण रेल्वेच्या सिग्नलमध्ये हिरवा रंग चालणार नाही असे हिंदुत्वनिष्ठांनी ठरवले तर कसे करायचे? मुसलमानांचा हिरवा रंग दिसल्यावर पुढे जायचे आणि आमचा लाल रंग दिसला. की थांबायचे हे रेल्वेचे धोरण मुळातच मुस्लिमधार्जिणे आहे. हिंदू आईबापांच्या पोटी जन्माला आलेला कोणीही गाडीचालक हिरव्या रंगाचा आदेश मानणार नाही, असे ठरवले तर? २८ नोव्हेंबर रोजी दिवा स्टेशनजवळ लांब पल्ल्याच्या गाडीच्या चालकाने हिरवा कंदील मिळाला तरी गाडी उभीच ठेवली, त्यामुळे अनेक स्थानिक गाड्यांचा खोळंबा झाला, लोकांना पायी परतावे लागले. गाडीच्या ब्रेकमध्ये नादुरुस्ती असल्यामुळे आपण गाडी चालवण्याचा धोका घेतला नाही अशी त्या चालकाने बतावणी केली; पण गाडीत काहीच दोष नव्हता असे रेल्वे अधिकाऱ्यांना आढळून आले. हिरव्या रंगाला मान न देणारा हा चालक कुणी हिंदुत्वगर्वी असला पाहिजे. हिरव्या सिग्नलला न जुमानण्याच्या या जाज्वल्य उदाहरणाने अनेक हिंदुत्वनिष्ठांचे रक्त सळसळेल. हिरवे सिग्नलही दर्लक्षून मुसलमानांनी इतिहासकाली केलेल्या अत्याचारांचा प्रतिशोध घेण्यासाठी ते बद्धपरिकर होतील. मग भले प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहतर!

 देवांना हिरवी पत्री, दुर्वा, बेल, बंद. हिरवा चुडा चालणार नाही. हिंदू गर्भारशी महिला डोहाळेजेवणाच्या वेळी माहेरी जाताना, सासरहून परत येताना हिरवी साडी शुभकुनाची म्हणून हौसेने नेसतात, हातात हिरवे चुडे भरतात. शिवसेनेच्या आदेशानंतर या सगळ्या स्त्रियांनी काय करावे? आणि बाळंतपणासाठी जातानाच भगवी वस्त्रे परिधान करून संन्याशिनीसारखे त्यांना रूप घ्यावे लागेल. अंगावर गोंदवून घेऊन हिरवे तिलक लावून घेतलेल्या सगळ्या स्त्रिया म्हणजे

अन्वयार्थ - एक / १८२