पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाळायचे असेल तर अर्थव्यवस्थेचे नियोजन झाले पाहिजे असा विचार अनेकांनी मांडला. समाजवादी, कल्याणवादी, नेहरूवादी वेगवेगळ्या पंथांनी सम्यक् आणि सूक्ष्म यात मूलभूत विरोध, एवढेच नव्हे तर संघर्ष आहे असे मांडून नियोजनाचा पसारा मांडला तो आता सारा ढासळून गेला आहे.
 पर्यावरणवादी सोडल्यास सम्यक् आणि सुक्ष्म यात मतभेद असल्याचे आता कोणी मांडत नाही. हा वेदान्त तत्वज्ञानाचा मोठा विजय आहे.
 व्यक्तीची संघावर मात
 संघशक्ती मागे पडत आहे. व्यक्तीचा उदय होत आहे. 'कलौ संघे शक्तिः' हे वचन मानले. तर कलयुग संपले आहे, असे समजावे लागेल. आर्याचा वेदांमध्ये सांगितलेला धर्म हा संघाचा धर्म आहे. ज्यु, ख्रिस्ती, मुसलमान हेही संघधर्म आहेत. या सर्व संघधर्मांचा पराभव होतो आहे. उद्योजकांच्या नव्या युगात व्यक्तीनिष्ठ वेदान्त तत्वज्ञानाचा म्हणजे साम्यक् आणि सूक्ष्म यास अभिन्नत्व उदय होतो आहे.
 भारतीय जनता पार्टीच्या प्रात्सोहानाने अर्थशास्त्र लेखन कामाठीस भिडलेल्या विद्वानांना वेद मान्य आहे, असे दिसते; पण उपनिषिदे मान्य आहेत किंवा नाहीत याबद्दल स्पष्ट संख्येत मिळत नाहीत. उपनिषदांचे अर्थशास्त्र अजून कोणी मानलेले नाही. 'पिंडी तेच ब्रह्मांडी' असल्यामुळे मध्यस्थ नियोजकांची आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्तीने आपले व्यक्तिमत्व प्रमाण मानून धडपडत राहवे. कोट्यवधी प्रणिमात्रांच्या अशा धडपडीतून त्यांनी केलेल्या चूकांमधून, सुधारनातून सर्व समाजाचे एवढे नव्हे तर, सर्व विश्वाचा हेतू साध्य होतो, थोडक्यात स्वतंत्र्य, अर्थव्यवस्था हे उपनिषदांचे अर्थशास्त्र आहे आणि गंमत अशी, की हिंदुत्वाचा झेंडा मिरविणारे त्याचा विरोध करत आहेत. संघर्ष उघड उघड एका बाजूला वेध आणि दुसऱ्या बाजूला वेदान्ताचा शेवट करणारी उपनिषदे असा आहे.

(१९ नोव्हेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १६९