पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आवाज का उठवता येऊ नये? सद्य:स्थितीत नवे कर बसवणे सर्वथा अयोग्य आहे; पण नवे कर बसवले तर ते राष्ट्रीय कर्ज फेडण्याकरिता वापरले गेले पाहिजेत. पुढाऱ्यांच्या आणि नोकरदारांच्या चैनबाजीकरिता नाही, हे करदाते स्पष्ट करू शकणार नाहीत काय? आम्ही उत्पादन वाढवू, ज्यादा करही सरकारला देऊ; पण त्यांचा उपयोग सरकारी उधळपट्टीकरिता होता कामा नये असे करदात्याने शासनाला निक्षून सांगणे आवश्यक आहे.
 पोरगे उनाड, मास्तर चाबरा, पालक आंधळा! वित्तमंत्री लोकसभेला खुष ठेवतात, नानीला बनवतात, मग पोराला धाक बसावा कसा? घरातल्या एखाद्या कोणाला तरी धारिष्ट्य करावे लागेल.

(४ नोव्हेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १६०