पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुंती कोण? याचे उत्तर मोठे कठीण आहे. जी चार पाच उत्तरं संभवतात त्यांचा विचार केला म्हणजे 'राव'साहेबांची तुलना अगदीच गचाळ आहे असे वाटते.
 पुत्र नव्हे मलमूत्र
 महाभारतातील कुंती धर्मराजाचे ढोंग, धूर्तपणा, निष्क्रियता, वाचाळता या अवगुणांमुळे संतापून जाते. असा पुत्र असून काय उपयोग? त्यापेक्षा नसलेला बरा. अशी ती त्याची निर्भर्त्सना करते तरी, धर्मराजाची शांती ढळत नाही. तेव्हा कुंती त्याला संतापाच्या अतिरेकात म्हणते, "तू माझ्या पोटातून आलास म्हणून तुला पुत्र म्हणायचे; पण पोटातून पुत्रच येतो असे नव्हे, धर्मराज! तू पुत्र नव्हे, मलमूत्र आहेस."
 आधुनिक घटनेतील कुंती कोणीही असो, धर्मराजाच्या या आधुनिक आवताराला उद्देशून ती हेच बोलली असती. द्रौपदी वस्त्रहरण उपमा देताना 'राव'साहेबांना महाभारतातील या कुंतीच्या उद्गारांचीही माहिती असणारच, कारण ते 'महापंडित' आहेत!

(२९ ऑक्टोबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १५५