पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कनिष्ठांची दुक्कल
 नकुल-सहदेव ही दुक्कल साऱ्या महाभारतात फारसे काहीच करीत नाही; पण पाच पांडवात त्यांची मोजणी मात्र होते. शंकरराव चव्हाण अयोध्येतील वस्त्रहरणाच्या वेळी दिल्लीत बसून होते आणि शरद पवार वस्त्रहरण होणार अशी निश्चित बातमी कळल्यामुळे वस्त्रहरणाच्या चित्रीकरणाच्या खटाटोपास लागले हाते. तेव्हा शंकरराव, शरदराव ही जोडी नकुल सहदेवाच्या जागी फिट बसावी.
 बलभीम कोण? दाऊद इब्राहिम?
 कमतरता पडते ती फक्त बलभीमाची. या सगळ्या पांडवांत बलभीम कोणीच दिसत नाही. वस्त्रहरणाच्या वेळी संतापाने डोळे रक्तासारखे लाल झालेला, मुठी करकचून आवळणारा, दातओठ करकचून चावणारा बलभीम ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत काणीच नव्हता. वस्त्रहरणाच्या प्रसंगानंतर आपल्या मनातील धगधगती सूडाची इच्छा द्रौपदीने फक्त एक पांडवांना सांगितली, धर्मराजाला नाही, अर्जुनाला नाही, फक्त भीमाला. वस्त्रहरणाच्या आठवणीने जळत राहिला ती फक्त बलभीम. दुःशासनाने द्रौपदीला दाखवलेली मांडी फोडून तथील रक्त घटाघटा पिण्याची आणि द्रौपदीचे मोकळे झालेले कसे त्या रक्ताने माखवून मग तिची वेणी घालण्याची घनघोर प्रतिज्ञा करणारा आणि ती निर्धाराने पार पाडणारा भीम. 'राव'साहेबांच्या पांडवात भीम कोण? दाऊद इब्राहिम?
 शरदरावांचा तिहेरी रोल
 शरद पवार यांची मुख्य भूमिका सहदेवाची; पण त्यांच्यात थोडा अर्जुनही आहे. कुरुक्षेत्रावर उभे राहिल्यानंतर अर्जुनाला दोन्हींकडे आप्तबांधव दिसू लागले. शरदरावांचे स्नेहीजन पांडवांपेक्षा कौरवांतच जास्त बसलेले. या महाभारताच्या नौटंकीत शरदरावांकडे एक तिसरी भूमिकाही येण्याची शक्यता आहे. द्रौपदीच्या अपमानाने संतापून काही प्रतिशोध बलभीमाच्या हिरीरीने घेतला तो दाऊद इब्राहिम आणि पप्पू कलानी, ठाकूर संबंधांतून शरदरावांचा या आधुनिक भीमाशी स्नेहसंबंध स्पष्ट आहे. एकाच वेळी सहदेव, विषादातील अर्जुन आणि भीमाचा साथीदार अशी तिहेरी भूमिका शरदरावांकडे दिसते.
 एका उज्ज्वल शोकांतिकेचे रूपक एखाद्या आधुनिक लज्जास्पद घटनेवर केले, की अशा गमतीशीर तुलना घडू लागतात.

 'राव'साहेब प्रमुख पांडवांच्या बरोबर कृष्ण नाही. आहेत ते भीम, पांडव उघडपणे आपला म्हणायला तयार नाहीत आणि शेवटी 'राव'साहेबांच्या रुपकातील

अन्वयार्थ - एक / १५४