पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/149

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तांबडी, पिवळी वेगवेगळी बटने दाबून माकडाने अवकाशयान योग्य मार्गावर आणले, तोपर्यंत बर्नवाचे पाकीट उघडूनसुद्धा झाले नव्हते. संथपणे पाकीट उघडून झाले, त्यातील कागद काढला गेला. कागदाची घडी उलगडून कागद सरळ झाला. बर्नवासाठी एकच वाक्याची सूचना होती – "माकडास वेळोवेळी खाऊ घालणे." देशातील सार्वजनिक सेवांचे अवकाशयान नीट चालायचे असेल तर कुत्रे, माकडे यांचा मोठा उपयोग होईल. त्यांना खाऊ घालण्याचे काम माणसांना राहीलच, ते त्यांनी नीट पार पाडावे म्हणजे मिळविली!

(१४ ऑक्टोबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १५०