पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






श्वानासाठी साडेपाच हजार : माणसासाठी किती?


 वेठबिगारांच्या संघटनेचे नेते स्वामी अग्निवेश मोठे प्रभावी वक्ते आहेत. समाजातील विषमता श्रोत्यांच्या मनावर ठसविण्याकरिता आपल्या भाषणातून ते नेहमी एक उदाहरण देतात. आगगाडीच्या डब्यातून एक साहेबीण तिच्या कुत्र्यासह आरामाने प्रवास करीत असते. तिचे कुत्र्याचे लाड करणे, मुके घेणे चालू असते. नाश्त्याची वेळ झाल्यावर, थर्मासचा मोठा डबा उघडून उकडलेली अंडी, मटन, दूध वगैरे कुत्र्यासमोर ठेवले जाते आणि शेवटी कॅल्शियम व व्हिटॅमिनच्या गोळ्याही कुत्र्याला देण्यात येतात. कुत्र्याच्या या ऐश्वर्याचे रसभरित वर्णन करून स्वामीजी म्हणतात, "देवा, या देशात माणसाच्या जन्माला घालण्यापेक्षा कुत्र्याच्या जन्माला घातले असते तर किती चांगले झाले असते?"
 खुद्द कुत्र्यांनाच इतर कुत्र्यांचा राग असतो. स्वजातीय एकमेकांवर दात काढू लागले, की त्याचे वर्णन 'श्वानवत् गुर्गुरायते' असे करतात.
 साहेबिणींच्या कुत्र्यांबद्दलचा मत्सर स्वामीजींच्या नाही, तर अनेकांच्या मनात डचमळत असतो. लार्सन आणि टुब्रो या कंपनीच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका कारखान्यात सुरक्षेसाठी अकरा 'डॉबरमन' जातीचे कुत्रे सेवेत ठेवले आहेत. प्रत्येक कुत्र्याला दरमहा पंचावन्नशे रुपये पगार, शिवाय दररोज दोन अंडी, दोन लिटर दूध, चार किलो मटन असा खुराक आहे. या कुत्र्यांना दिवसातून तीन वेळा आंघोळ आणि दर रविवारी वैद्यकीय तपासणी अशा भरभक्कम 'पर्क्स' ही आहेत.
 कुत्रे, मुले आणि पैलवान

 हे वर्णन वाचून भल्याभल्यांच्या पोटात दुखू लागले आहे. देशात माणासासारखी माणसे उपशी आहेत. अमरावती जिल्ह्यात कुपोषणाने शेकडो मुलांचे बळी गेले आणि तेथून थोड्याच अंतरावर कुत्र्यांची अशी भरपेट चंगळ चालते याबद्दल

अन्वयार्थ - एक / १४६