पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अमेरिकी अर्थव्यवस्था कोसळते. समाजहिताचा बकवास बंद पडतो अशी त्या कादंबरीची कथा आहे.
 भारतातही या शेषाला जाग येते आहे. समाजहित, गरिबांचे दुःखहरण, राष्ट्रभक्ती, स्वदेशी असल्या घोषणांखाली आपला भार वाहणाऱ्यांनाच सतावण्याची पद्धत मोडकळीला आली आहे. हा शेष आता पृथ्वीगोल हलवणार आहे, शेषाच्या या क्रोधाची पहिली जाणीव करून दिली, नेटाने करून दिली याबद्दल ट्रकमालकांचे पुन्हा एकदा अभिनंदन. सरकारने आश्वासन पाळले नाही तर पुन्हा एकदा संपावर जाण्याची तयारी ट्रकमालकांनी ठेवली आहे. हेही लक्षात घेण्याजोगे आहे.

(०६ ऑक्टोबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १४५