पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






आधुनिक पृथ्वीचा तोल सांभाळणारेच संपावर


 ट्रक मालकांचे अभिनंदन! शतशः अभिनंदन! महिन्यापूर्वी वाहतूक बंद करून त्यांनी पथकर रद्द करून घेतला याबद्दल हे अभिनंदन नाही. जकातकराचा ठरीव कालावधीत फेरविचार करण्याची कबुली त्यांनी सरकारकडून वदवून घेतली याबद्दलही ही बधाई नाही. पथकर रद्द करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आणि त्याऐवजी वाहनाच्या परवान्याची फी भरमसाट वाढवली, १५०० रुपयांपासून एकदम ५००० रुपयांपर्यंत चढवली, त्याला विरोध करण्यासाठी वाहनमालक पुन्हा एकदा दंड थोपटून उभे राहिले याबद्दल हे अगदी मनापासूनचे कौतुक आहे.
 मी शेतकरी आहे. वाहनांच्या संपामुळे भाजीपाला, फळे इ. नाशवंत माल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, होणार आहे आणि तरीही मी वाहनचालकांची प्रशंसा करतो आहे.
 बहुतेक आंदोलने मोठ्या तडाख्यात सरू होतात. आदोलकांचा प्रक्षोभ इतका तीव्र असतो, की लढाईच्या पहिल्या फेरीत उत्साह टिकवून धरणे फारसे कठीण नसते. लढा शिस्तीत चालेल, शांततेने चालेल, आदोलनाविरुद्धचा खोटा प्रचार यशस्वी होणार नाही याची खबरदारी घेणे एवढी पथ्ये सांभाळली, की झाले. बिलामत सुरू होते ती वाटाघाटी सुरू झाल्यानंतर. वाटाघाटी थोड्याफार यशस्वी झाल्या. म्हणजे रोषांची कोंडलेली वाफ निघून जाते. आंदोलक रणभूमीवर जिंकतात आणि वाटाघाटीत हरतात.

 वाटाघाटीत तयार झालेल्या करारनाम्यांच्या अटींच्या शब्दांबद्दल, अगदी स्वल्पविरामांबद्दलसुद्धा खळखळ सुरू होते आणि सरकार मोठ्या युक्तीने आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसते. नर्मदा बचाव आंदोलनाची दिल्लीतील वाटाघाटीनंतर झालेली दुरवस्था याचे चांगले उदाहरण आहे. लढ्याच्या

अन्वयार्थ - एक / १४१