पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटले असावे. अन्यथा, आपला अहवाल फारच कढत होईल आणि त्याला कोणी हात लावणार नाही अशी त्यांना चिंता पडली असावी; पण राजकीय दृष्टिकोनातून सुधार भारतीय जनतेला कसा खपवावा याचे धडे भगवतींनी पी. व्ही. नरसिंह रावांना द्यावे हे मोठे अजब आहे. पंतप्रधानांच्या कामगिरीबद्दल पुष्कळ मतभेद आहेत; पण "म्हातारा राजकारणात मोठा बेरकी आहे, काही न बोलता भल्याभल्यांना नामोहरम करतो." अशी त्यांची ख्याती झाली आहे. मुत्सद्दीपणाच्या एका गुणावर पंतप्रधानपदी टिकलेल्या नरसिंह रावांना जगदीश भगवतींनी राजकीय सल्ला द्यावा म्हणजे 'न्यू कॅसलला कोळसा' नेण्याचाच प्रकार!

(०८ सप्टेंबर १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / १३६