पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विरोधी पक्षांनी केलेला गोंधळ सावरण्यासाठी आर्थिक सुधार सुरू केले, असा जो युक्तिवाद केला जातो त्याबद्दल भगवती-श्रीनिवासन म्हणतात,
 "...(विदेशी मुद्रेचे) संकट आपल्यावर कोसळले नसते तर सुधारांची सुरुवात पुढे ढकलली गेली असती...वित्तसंस्थांनी लादलेल्या अटीमुळे सुधार सुरू करण्याची आमची इच्छाशक्ती मजबूत झाली हेही खरे."
 "आपल्या देशाच्या धोरणात असे सुधार १९६० सालापासूनच सुचवले जात होते. आपल्याच अर्थशास्त्रज्ञांनी सुचविलेले विचार त्या काळी शासकांनी आणि अनेक अर्थशास्त्रज्ञांनीही अव्हेरले. तेच विचार आता जगन्मान्य होऊन आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत परत येत आहेत."
 "... सुधारांचा अर्थ पंतप्रधान नेहरूंच्या काळापासून आपण जे जे केले ते फसले अशी समजूत होते. सुधारांचा कार्यक्रम ज्या महत्त्वाच्या क्षेत्रात आज राबवावे लागत आहेत त्या क्षेत्रात ते बहुतांशी खरे आहेत."
 "निर्यात करण्याच्या शक्तीविषयी आमचा निराशावाद १९६० सालानंतर अनावश्यक होता."
 "सार्वजनिक क्षेत्रावर भर देण्याचे धोरण असेच अवास्तव असल्याचे साठीच्या दशकाच्या शेवटापर्यंत स्पष्ट झाले होते."
 "सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षमतेमुळे सरकारी उत्पन्नात भर पडली नाही, एवढेच नव्हे तर परिणामतः सर्व अर्थव्यवस्थाच अकार्यक्षम झाली."
 उदाहरणे वानगीदाखल अजून कितीएक देता येतील. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्व आर्थिक धोरणांची इतकी प्रभावी वासलात दुसऱ्या कोणी लावल्याचे माझ्या पाहण्यात नाही.
 पण नेहरू मोठे आदरणीय
 पण हे सगळे स्पष्टपणे लिहिताना मधूनमधून; "पण ब्रुटस मोठी आदरणीय व्यक्ती आहे." असे म्हणण्याचे कसब मार्क अँटनीइतकेच जगदीश-भगवतींनीही साधले आहे.
 उदाहरणे :
 "पंडित नेहरूंचे सामर्थ्यशाली व स्वतंत्र भारताचे स्वप्न आर्थिक सुधार सातत्याने आणि प्रभावीपणे राबवल्यानेच साकार होईल."
 "पंतप्रधान नेहरूंच्या घोषणा... वरून स्पष्ट होते, की त्या काळाही गरिबी हटाव कार्यक्रम आर्थिक विकासाइतकाच महत्त्वाचा मानला जात होता."

 "... आपण काही सर्वच आघाड्यांवर अपयशी झालो असे नाही. आपली

अन्वयार्थ - एक / १३४