पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवाचिद्घनकृत. सर्व जगासि मि उत्पति कारण आणि प्रवर्तक मी सकळांचा ॥ यापरि जाणुनियां बुध पंडित ने भजती मज कायिकवाचा ॥ भाव सुनिश्चित अंतर आवडि सोस सदा बहु मद्भजनाचा ।। सांगतसे करुणाघन श्रीपति सार्थक काळ कसेपरि त्याचा ॥ ८ ॥ चित्त मदपर्ण चिंतन मद्रुप इंद्रिय जीवन मी जिहिं केला ।। स्वानुभवें निजबोध परस्पर बोधविती श्रुति जेथ अबोला ।। जाणुनियां मज कीर्तन ही करिती करि घेउनियां जपमाला ।। हर्षति आणि निवत्तिसुखाप्रति पावति वणं किती म्हण त्याला ॥ ९॥ आवडिने बहु जे भजती मज चित्त मदर्पण सर्व हि काळी ।। ज्ञान तयांप्रति देत मि ते मज जाणति व्यापक व्याप्य समूळी ।। बुद्धिसुयोग जया म्हणिजे कपिला दुसऱ्यांत तयास न्यहाळी ।। ज्यास अनुष्ठान पावति भक्त मला म्हण बोलतसे वनमाळी ।। १० ।। ने भजती मज त्यांस कृपाळ मि देउनि ज्ञान हि कार्य करी ।। जाण अविद्यक निर्मित हे भव नाशितसे ढग वायुसरी ।। कोठ वसोनि कसा हरिशी म्हणसी तरि आइक तेचि परी ॥ . बुद्धिसरी उजळे मग दीपक ज्ञान प्रभा तम सर्व हरी ॥ १२॥ ब्रह्म परात्पर तूं चि हरी शुभ पावन धाम हि तूं चि हरी ।। सर्व पवित्र हि तूं चि हरी अज व्यापक हे जग तूंचि हरी ॥ नाश नसे तुज तूं चि हरि क्षर अक्षरे उत्तम तूं चि हरी || दिव्य सुरांदिक तूं चि हरी तुज पार्य म्हणे किति वानं हरी ॥ १२ ॥ या च रिती परब्रह्म परात्पर तूं मज सर्व ऋषी कथिताती ।। नारद नित्य करी हरिकीर्तन गीत स्वयेंच धरूनि प्रतीती ।। आणिक आसित देवल ही मुनि श्रीगुरू व्यास सदा तुज गाती ।। तूं चि स्वये पर ब्रह्म मि सांगसि त्या वचने हरिली भवभ्रांती ।। १३ ।। फार जनी कथिले तई अज्ञ मि शब्दसुखे गित ऐकत राहे ।। जे अजि सर्व हि सत्य मि मानित जे तुझिया वचनी रवि पाहे ।। हे भगवंत तुझे अवतार न जाणति दानव देव कदा हे ॥ निग्रह की करिसील अनुग्रह शेष धरातळिं वानित राहे ।। १४ ।। तूं आणिकांस न जाणसि हे मज प्रत्यय सत्य हि तूं चि कथीशी ।। हे पुरुषोत्तम तूं अज अव्यय जाणास तूं अपणे अपणासी ।। हे भुतभावन भूतगणाधिप देवपती नगपालक होसी ।। ६८ क्षर=नाशवंत. ६१ अक्षर अविनाशी. ७० वानुवर्जू,