पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ताटकावधः जेणे चंड रथी रिपूस उलथी पृथ्वी करी पालथी । जाले शिक्षित वीर दीक्षितमुखे तोषोनि त्या कौतुका । पायां वंदिति चापपाणि मग ते शिष्यांसवे देशिका ॥ ३८ ॥ एवं राम मुनींद्र लक्ष्मण तिघे गांभीर्यलीलागती । जातां कौतुक एक अद्भुत दिसे पक्षी नभी लागती ॥ स्वैर श्वापद संघ धांवति भये दंती दिगंताप्रती । जाती लंघिति काननी कवण हा कोल्हाळ जी सांप्रती ॥ ३९ ॥ वारा कां सुटला निनाद फुटला का देश बोभाटला । मेघाच्या पटला परी उमटला पांशू नभी दाटला ॥ बोले राम मुनीसि पाय नमुना आज्ञा करा नेमुनी । काळाते दमुनी न सोडिन शरा क्षेमस्थिती कां मुनी ॥ ४० ॥ ऐसी व्याकुळ वाट कां मुनिवरा हे धावती थाट कां। मोठा घोर अचाट काननतटी वंश क्षिती दाट कां ॥ रक्षोरूप जुनाट कामिनी फिरे साधूजनी कांटका ॥ ऐके चिन्मयनाटका रघुपती आली दिसे ताटका ॥ ११ ॥ बार्ता ऐकति रामलक्ष्मण असी तो धांवली कर्कसी। घोराकार करीलदंष्ट्रवदना तदृष्ठि बालार्कसी ॥ हाडांच्या अळुमाळ डोलति गळां माळा कटी कांबळा । जिव्हा लोळतसे मुखी लळलळां येते धरोनी बळा ॥ ४२ ॥ दंती चावित सिंह कुंजर मगे हाती कितेकां धरी । पातीं झांकुनि ऊघडी घडिघडी माती कानांवरी ॥ कोराकाटलिया मुखी कटकटा ढोराचियां श्रोणिते। घोरावेशशरीर एक नटली थोरा भया आणिते ॥ ४३ ॥ बाळे देखुनि रामलक्ष्मण पुढे चाटी अवाळेपरी । हुंकारी क्षण हा करीत तंव ते वाढे उडे अंबरी ॥ अट्टाहासुनि मट्टमट्टकरिते श्रीरामसंघट्टणी। धांवे तो क्षितिकंप हा-रव उठे देवांचिये पट्टणीं ॥४४॥ येतां सन्मुख राक्षसी लघुलघू धमापालवंशाग्रणी । कोधे दुर्धर वीर राम उठला शिक्षावया तत्क्षणी॥ तूणी बाण गुणी धरोनि सहसा कर्णीत आणी रणीं। हाणी तो धरणीवरी उलथली उत्साह (तांगणी ॥ ४५ ॥ १ गुरू. २ समूह. ३ धुरा, ४ स्त्री. ५विस्तृत . ६ केस. ७ राजा. ८ ब्रह्मा,