पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आनन्दतनयकृत. वन बहु बरे गा मुनिपदात लालाका सवाई. केवळ हे सकुमार कुमार बहू रजनीचरभार वनीं ॥ युद्धमखीं रिपु वध्य न यांसि असाध्य अबोध्य तिहीं भुवनीं ॥ नेणति हे परलोक विलोकन कोकनंदा-सम पाणिपदें॥ वशिं तुझ्या अवतंस मुले मज संशय हा चि कसा न वदे ॥२९॥ श्लोक. - पायां नमी देईन वंशसारी । पा यां न मी दे इनेवश सारा ॥ न या वयामाजि भला जनां दे । न यावया माँ जिम लाज ना दे ॥३०॥ दशरथ नृप बोले राम नेदी कदापी । मुनिवर मग बोले कोपला तीव्रतापी ।। बहुत बहु बरे गा तूं सुखी पुत्रदारा। सहित सदनिं नांदे सूर्यवंशी उदारा ॥३१॥ नमुनि मुनिपदाते लक्ष्मणा आणि रामा । सरस यश वराया देइं लोकाभिरामा ॥ तनय नयगुणाचे शीघ्र घेवोनि येतो । सकृप नृप उठाव लोक सारा पहातो ॥३२॥ धावता नृपति तीव्र गती घे। लागती मुनिपदाप्रति तीघे ॥ दीधला दशरथे सुत भावे । हांसिला मग मुनी अनुभावे ॥३३॥ आनंदे मुनिवद सुंदर जयध्वाने अयोध्यापुरा ॥ आशीर्वादुनि साधु साधु वचने आले तदा गोपुरा ।। वाद्ये वाजति भेरि दुंदाभि सभासद्मी गुड्यातोरणीं ॥ नारी आरतआरत्या करिति त्या जैशा रतीधोरणी ॥३४ ॥ संफूल्ल 'मल्लिकापुष्पे हर्षे वर्षति सुंदरा। भाट आधाट भाटी वा [?] भासती भव्य भूवरा ॥ ३५ ॥ थापितां मुनिवर सहसा रे । राहिले नप जनादिक सारे ॥ चालिला त्यजनि दूर अयोध्या । शौर्यमंडित समागामि योद्धा ॥ ३६॥ जाता नीट अचाट दाट अटवी वाटे दिठी लक्षिती । पट्टीश्वापद कूट थाट नटती बोभाटती लक्षिती ।। सिंह व्याघ्र कादि शंकर मगे दंती दरी राहती। वक्षीं पक्षि सहस्र लक्ष फिरती हे कौतुके पाहती ॥ ३७॥ दोघां दाशरथींस चालत पर्थी शस्त्रास्त्रविद्या कथी। १ समह. २ कमल. 3 भूषण. ४ उत्तमांश. ५ सूर्यवंश. ६ वयामध्ये. ७ 'न' कार. नीति. ९ ध्वनीने. १० गृहीं. ११ मोगरी, १२ स्तुतिपाठक. १३ दृष्टीने. १४ लांडगा. १५ डुकर. १६ हत्ती.