पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्घनकृत. अध्याय ८ वा. अर्जुन वीनवितो हरि साच तुझी वचने शुभ सत्तम आर्ती ।। आइकली परि अर्थ असाध्य पुन्हां पुसतों वद अद्वय मूर्ती ।। ते ब्रह्म काय कसे अधिआत्म हि कर्म कधी वळखी अधिभूती ।। देउनि सांग बरे अधिदैवत प्रांजळ ये मज लागि प्रतीती ॥ १ ॥ देहपरीत कसा अधियज्ञ कधी विधिने मध सूदन माते ।। आणि प्रयाण कसे करितां तुज ओळखणे दृढ नेमुनि चित्ते ।। या परिची ध्वनि दे वचनें अजि गूढ प्रकाशाने देई दिनाते ।। कल्पतरूतळिं वास करी तरि सर्व मनोरथ सिद्व चि त्याते ।। २ ।। श्रीहरि सद्गुरु सांगतसे अति पातळ जे गगने क्षरले ।। अक्षर ते नवछिद्रघटीं न गळे भरले जरि हारवले ।। ते परब्रम्ह घटादिक नाशत शाश्वत स्वस्थितिने राचले ।। ते अधिआत्म भतें घडती पड़ती अणि वर्तति कर्म भले ।। ३ ।। जो क्षरभाव तया अधिभूत म्हणों घडले गगनादिक भूती ।। त्यांत नरत्व अहंकृति सत्व तया अधिदैवत जीव वदेती ।। अक्षर आदि समस्त हि ब्रम्ह करी निज देहिं च द्वैतसमाप्ती ।। तो अधियज्ञ मि ज्ञानहुताशनि देउनि जाळित दृश्य अहती ।। ४ ॥ या परि जाणुनि वर्ततसे मज मद्रुप देह समंध च नाहीं ।। . तो मग सोडिल देह तयीं मज वांचुनियां गति नेणे कदाही ।। अंत सुनिश्चित तो चि तयां मज माजि मिळे भजने लवलाही ।। मी मज अव्यय भाव असंशय नित्य सुखास चि पावत पाहीं ॥ ५ ॥ प्राणिगणी धरिजे प्रित ज्यावरि ते चि तया मरणीं अठवे ।। पावति त्या च गतीस अचक किती भवती असें जन्म भवे ।। जागत जे जन हेत धरी निजतां च तयांपरि स्वप्न दिसावे ।। जाणुनि तूं भज कुंतिसुतां मज होशिल मद्रुप सत्य स्वभावे ।। ६ ॥ यास्तव जन्म-स्थिती-क्षय जाणनि तूं मजला स्मर सर्व हि काळी ॥ मत्पर होउनि युद्ध करीं मग लिंपिसि ना कधिं पापसमेळीं ।। बुद्धि तुझी निज निश्चय पूर्वक देखिल दे मन मात समूळी ।। पावसि मत्पद येथ असंशय हे करुणेन वदे वनमाळी ।। ७ ॥ ने विषयों जडले मन पावत संसति फार तया च गतीते ।। ___३४ प्रतीति अनुभव, खातरी. ३५ संसृति संसार,