पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्ध्वचिद्धनकृत. मी परमेश्वर जाणुनि इच्छित भेटति जे विषयों गतरागी ।। आत्मविज्ञानपथे चवथा मज भेद नसे म्हण त्यास च योगी ।। १६ ।। होउनि मद्रुप विश्व भरी भजतो मज आपण आपणियातें ।। जेवि जळी जळवीचि अभेद वरी करितो बरवे भजनाते ।। तो मज प्रीय जसा जिव मी प्रिय त्याप्रति जेवि जिवास जिवाते ।। तो मि वरी परि ज्ञान अभेद्य प्रभा विवरी दिपकादिपकाते ।। १७ ।। सर्व हि पर्व जरी विविधाकृति गर्वविवर्जित मद्रुप मानी ।। आत्मिक तो म्हण विश्वसमात्मक वर्त्तत माननि मे ततज्ञानी ।। आहे ससा मज युक्त चि होउनि सांठवतो मज माजि निदानी ।। यापरिचा अवदान्य अशी परमोत्तम सद्गति यास्तव वानी ।। १८ ।। सर्व भुती भजतां बहु जन्म किया फल दे मजलागि अहंता ।। तो शरणागत ये मग मी गरु होउनि बोधित ज्ञान सचित्ता ।। ज्ञान प्रकाशत ईश्वर विश्व करी इति निश्चय बुद्धिस पार्था ।। दर्लभ भक्त महात्मन हा बह जोडति झोबति जे विषयार्था ।। १९ ।। संतति संपति इच्छिति सिद्धि बहारिति त्या अति कामधुमाने ।। जाउनि ज्ञानसुलोचन अंध चुके मज मी जवळी च तमाने ।। दैवत देवि उपासन शासन मानुनि आचरिती नियमाने ।। आश करी अविनाश सुखाप्रति नास सदा मरती अभिमाने ॥ २० ॥ जो जन या भजतो तनु दैवत आवडिने मज अर्थ अपेक्षी ।। तो चि तया पुरवी कळ मी परि भाव धरोनि मुळास न लक्षी ।। पत्र फुले फळ डाहळिया अति मिश्रित शोभति एक च वृक्षी ।। दैवत संघत पासुनि सांडुनि तांदुळ भूस चि भक्षी ।। २१ ।। दैवत जे जसे आवाडे त्या परि पूजनपद्धति त्या च परीचा ।। इच्छित लभ्यतसे च तया आस जाहलि दाटि धरे बहुतांची ।। ती मज पासुनि म्यां सजली तरि आर्ति हि पुरविली भजकाची । देव खरा म्हण तोषति नाचति बैसविती प्रित ही पुढिलांची ॥ २२ ॥ दैवत अल्पक आवडि अल्प फळे क्षणभंगुर स्वप्न जसे ।। पावत त्या च पदाप्रति भक्त अवश्यक भव्य स्वरूप जसे ।। आणि मला भजती जन हे जगदीश्वर जाणुनि प्रेमवशे ।। ते असतां हि समग्र मदर्पण नोहति मद्रूप अंतिं कसे ॥ २३ ॥ मी परमेश्वर व्यक्त नव्हें मज व्यक्त चि मानुनियां शिणताती ।। २७ वीचि लाटा.