पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-६. शब्द नभांत नरी पुरुषत्व अहंपण ते मि म्हणे वनमाळी ॥ ८ ॥ जाण अविद्यक कश्मल टाकुनि शुद्ध सुगंध धरे प्रति तो मी ।। दाहक तेज धुमेविण निर्मळ भक्षक सर्व हि पावक नामी ॥ जीवन सर्व भुतां प्रति अन्न मि तृप्ति तृणी जिववीत जना मी ।। आणि तपी तप आचरती पण त्यांत वि ते तप जे मज कामी ।। ९॥ मळबिजी प्रणवांकुर विश्वतरू अहळी बहळी बहु फांके ।। त्यास फळे बिजरूप बहू भरली भुतसृष्टि बहूविध शाखे ।। नासत वृक्ष सेनातन बीज मधी मति बुद्धि असी प्रतिराखे ।। तेज मणी तमि तेज तयास्तव मोल तया निज तेज विलोके ।। १० ॥ आणि बलाबल ते मि स्वभाविक काम हि मी कवणे परि पार्था ।। धर्मविशी अविरुद्ध सवर्मत्वि कर्म नसे विषयावरि आस्था । वेदनियामक त्या च पथे विचरे न चळे अणु ही परमार्या ।। मोक्षपदी सहज स्थिति राबत साह्य असा चहुं ही पुरुषार्था ॥ ११ ॥ सन्मय सात्विक भाव समस्त हि राजस जे विषयीक विनोदी । तामस जे अति अज्ञ हि कर्म निषेधक दूषियले बहु वेदी ।। हे मज पासुनि ओळख तूं पण मी नव्हती रुप आइक शब्दी ।। वाढत लांकुड बीज नव्हे धुम अग्नि नव्हे मज मी च अनादि ॥ १२ ॥ हे त्रिगुणात्मक भाव मिळोनि जगा प्रति मोहितसे गुणमाया ।। अज्ञकरी सुख संसृतिचे बहु झोबविते लटक्या फटक्या या ।। मी परब्रम्ह परात्पर नेणुनि पावति सर्व हि थोर अपाया । घात करी घर बांधुनि कोश-किडा अपणापण पांडवराया ॥ १३॥ दुर्गम हे गुणि दैव उलंघुनि केवि जिवाप्रति सद्गति आतां ॥ पीपिलिके परपारमहोदधि की मशके कनकाचलमाथां ॥ जे भजती मज सर्व भुतपति लागि सतीशिशु नातरि माता ।। ते तरती सरिता मम आइक आइक पावति जे नर पाता ॥ १४ ॥ दुष्कृति जो नर ईश्वर नेणुनि भ्रांत भवी मन कामन वाचा ।। मंदमती असुरी जन प्राकृत छंद जया न सुटे विषयाचा ।। अंध सदा हत माय न ज्ञान मि सन्निध चालक जो हषिकांची ।। त्या मज यति च ना शरणागत अंधतमे बह शीण तयांचा ॥१५॥ आइक आणिक चारविधी सुकृती जन जे भजले मज लागी ।। ते पहिली धरि आवड माझि च शोध दुजा करि सज्जनसंगी ।। २४ पिपीलिक मुगळा. २५ कनकाचळ=मेरु. २६ हृषिके इंद्रिये,