पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-६. (५९) जे मनबुद्धिअगोचर ते परब्रम्ह सुखेनि होत निजांगों ।। जेथ नसे दुःख तेवि असे सुख होवुनियां सुखमात्र चि भोगी ।। अंतर बाहिर भेद नसे सम सर्व भुती भजतो मजलागीं ॥ २८॥ सर्व भुते अपणांत चि लक्षित सर्व भुती रुप आपण पाहे ।। यापरि तो समदर्शि विलोकित हेम नी कनकी नगता हे। नातरि तंतु पर्टी पट तंतुर्वि काय जळे लहरी जळवाहे ।। जो निजयोगपथे मन स्वस्वरूपी समस्वानुभवें दमिताहे ॥ २९ ॥ जो मज सर्व भुती अवलोकित आपणिया गवसोनि पहाते ।। सर्व भुते मजमाजि असे तुपस्वाद कणीक निका तुप होते ।। तो मज भिन्न न वाटतसे मज भिन्न न मानित तो निज चित्ते ।। तो मि अते कथणे हि नसे मुळ एक परी भजतो अधिकते ॥ ३०॥ सर्वभुतात्मक मी मज जाणुनि जो भजतो निज ऐक्य न मोडी ।। येकपणे लहरीजळसे परि सिंधुसि सैंधव साकर गोडी ।। भिन्न जरी दिसतो मिठपर्वत वर्तत ते जळ संग न सोडी ।। योगि तसा मजमाजि च वर्तत द्वैत निषेधुनि शोधनि सोडी ॥ ३१॥ जो अपणा सम सर्व हे पाहत जेवि अवशरीर जगासी।। तो सुखकामग होउन सर्व समात्मकभाव जयासी ।। हे नप अर्जुन सांगु किती परमोत्तम योगि मि मानित त्यासी ।। पांडव हे परिसोनि अशंकित वीनवितो हरिच्या चरणासी ॥ ३२ ॥ हे मध सूदन हा समयोग तवां कथिला मज दर्गमे वाटे॥ स्थीर नव्हे स्थिति इंद्रियवर्ग अर्थ चि ग्राहक गोदरि दाटे ।। चंचल चित्त अचंचल होउनि जाग कदापि न ये समबाटे ।। या सकळा मुळ नारि च भोगित संसति हे हरि हे मन खोटें ॥३३ हे मधुसूदन मानस चंचल यासि कधी धिर अल्प असेना ।। जेवि सवे दृढ तस्कर घातक तेवि बळे करि घातक नाना ।। त्यासि करी जंव निर्ग्रह नेमुनि युक्ति करी सहसा गवसेना ।। वायु जसा दमितां न दमे अति दुष्कर त्यापरि हे अवरेना ।। ३४ हे जयबाहु ! नको धरूं संशय चंचल हे मन निग्रह यासी । अभ्यसने तुज काय अशक्य निराश्रय येक नभी गति त्यासी ।। ५३ सुखेनिव-सुखानें. ५४ तंतुवितंत. ५५ अवेव अवयव. ५६ दुर्गम ५७ स्वअर्थ=इंद्रियार्थ ( विषय). ५८ गोदरि-इंद्रियरूपी दरीत. ५९ ससृति-संसार निग्रह-दमन. ६१ नेमुनि=नियमून, निग्रह करून.