पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ताटकाववष. कथा ऐसी भूपाळ वदे कांहीं । माचि येतो भीडण्या बळे बाहीं ॥ वाहिनींचा संभार सुखे पाही । विन्न हरती संदेह दुजा नाहीं ॥१७॥ राम नेदीं ह्मणवोन मुनी-नाथा । पदै साकेताधीश नमी माथां ॥ उठे कोपे गाधेय तूज गोथा । म्हणे राया निःसत्व वृथा चोथा ॥१८॥ माग आधी बोलोनि सरे मागें । भूप ऐसा देखिला नाहिं मागे ॥ सुखे नांदें सुपुत्रपणे रागे । करी डोळे विस्तीर्ण महारागें ॥१९॥ श्लोक. बचन वदुनि ऐसे चालिला चार पांडे । तंव भुमि-रव जाला फूटले जैवि भांडे ।। जलधिसहित मेरू आणि भूकंप झाला । कुलगुरु नपरोहा तीव्र धांवोनि आला॥२०॥ वर येतो ह्मणवोनि उठे चाले ॥ तदा झाला भूकंप धरा हाले । वसिष्ठादी धांवोनि ऋषी आले । कासया हे उत्पात नपा जाले ॥२१॥ श्लोक. वसिष्ठ बोले न पडें अपायीं । द्यावी मुले शीघ्र पडोनि पायीं ॥ हा कोपल्या नाळिल लोक सारा । कां नेणसी भूपात नीति-सारा ॥२२॥ PO दिडी. जानदृष्टी पाहोनि ह्मणे राया ॥ भाव नेणे हो मनी मोह माया ॥ रामचंद्रा देवोनि पडा पायां ।। विजयि तेणे होईल नव्हे वायां ॥२३॥ पुत्र देई गाधेयकरी आधी ॥ समाधाने कार्यार्थ वह साधी ॥ गुरूवाक्ये परिसोनि सर्वसाधी । कौशिकातें भूपाल समाराधी ॥२४॥ रामसौमित्री वीर चापपाणी ॥ पदी मुनिच्या लागती सौख्यखाणी ।। ऋषी जाला सानंद सभास्थानी ॥ नामघोषे धानंदतनय वाणी ॥२५॥ श्लोक. रघुपती दिधला मुनिकारणे । सह सुमित्र दुजा अवधारणें ॥ मग नरेद्र ह्मणे ऋषि कौशिका ॥ उभयतां प्रतिपाळ किजे निको ॥२६॥ कशास आह्मां धनवस्त्रभूमी ॥ निष्काम निधूतभव प्रभो मी ॥ केला मेखी घोर निशाचरींनीं ॥ आलो कराया न निशा च रानी ॥२७॥ अभोजेक्षण रामलक्ष्मण तुझे हे दक्ष रक्षोगणा ॥ शिक्षाया शत लक्ष लक्ष करिती एक्या क्षणी मार्गणा । हे द्यावे मज लक्ष-लक्षणनिधी संरक्षणाकारणे । काक्षे नेघ [?] सपक्ष हो क्षितिपती त्वत्क्षात्र संरक्षणें ॥२८॥ र सेना. २ पूजी. ३ वी. ४ चांगला. ५ यज्ञांत. ६ राक्षसांनी. ७ कमलनेत्र.