पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१. अध्याय ६ वा. देव म्हणे तुज सांगितले अति विस्तर कर्म विशेषुनि ज्ञाने ।। ते अणि कर्म फळे फळ एक चि तो कायला निज योग विधाने । त्यागनि कर्म फळा करि कर्म अनाश्रित जो निरहंकृति माने ।। योगि हि तो परिव्राज हि तो न च कर्म न यज्ञक्रिया त्यजिल्याने ॥१॥ त्यागुनि कर्मफळा प्रति कर्म करी तरि योगि तया म्हणिजे ।। तो चि तुं पांडव ब्रह्म-अनूभव कल्पुं नको मार्ने भान दुजे ॥ जो न त्यजी फळ आस धरी निज कर्म अहंकृतिने रुदि जे || . तो न च ज्ञानि हि योगि हि तो समचित्तसमाधि सुखे न भजे ॥ २ ॥ इच्छिल जो निज ज्ञान मुनीजन योग तई निज कर्म करावे ।। होउनियां निरहंकृति कर्मफळा प्रति निश्चित जाण त्यजावे ।। तो फळ त्याग कसा घडतो तरि हे मन स्वस्वरुपांत दमावे ।। कोण तई फळ इच्छिल कर्म चि ब्रह्मस्वरूपक ज्ञान स्वभावे ।। ३॥ जे समयीं मन स्वस्वरूपी मग इंद्रियेअर्थ सतीपरि भोगी ।। यत्न कदा न करी सहज स्थितिने फळकाम नव्हे अनुरोगी ।। कहिप च ना अमुके अमुक्यास्तव वास्तव मूळ अहंकृति त्यागी ।। अल्प अनल्प सदा समतुष्टत तो चढला निजयोग-तुरंगी ॥४॥ हे मन नेमित आत्मरुपी जई संतगुरूवचने विवरोनी ॥ उद्धरितो अपणासि च आपण हा भवसागरपार तरोनी ।। या परिचा उपकार करी तरि बंधु स्वये अपणासि च मानी ।। आपण जे अपणा बुडवा तर शत्रु स्वये अपणास निदानी ।। ५ ।। जे अपुले मन आपण अक्षाय तो अपणा प्रति बंधु न्यहाळी ।। ज्यास नसे वश हे मन जीवपणे पडला दृढ संशयजाळी ।। आडकला तरि तो अपणास चि आपण शत्रुपणाप्रति चाळी ।। जन्मक्षयातित आपण जितुन आत्मरुपी विवरीत समूळीं ॥ ६॥ जितुनि जो मन स्वानुभवे सम आत्मसुख अनुभूतिंत राहे ।। ही उन्हें सुख दुःख समान चि मान हि तो अपमान हि साहे ।। जैवि नभी अने काहिं न बाधत व्यापक तो जरि होउनि आहे ।। परिवाज-संन्यासी. २ रुढिवादे, रुजे. ३ इंद्रिय अर्थ=विषय. सती अतिनता ५ अनुरागो=आवड ठेवणारा. ६ आत्मरूप परमेश्वरस्वरूप. ७ विवरोन विचार कर ८ मिदानी अखेरीस. ९ अनुभूति अनुभव. १० होव-हिम (थंडी.) ११ नभ आकाश १२ अन=अन्य. ११ एथें । ल्या प क त ' अशी अक्षरे मांत दिसतात.