पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपडित. काम विकार सदां विषयासरिसे निजसंपत्तिनै उठताती ॥ चेतविला जिहि ज्ञान हुताशन त्यास तया सह जाळुान ठाती ॥ आत्मसुखे सुखऐक्य पुरातन बाहिर दहिं जरी दिसताती ॥ ते सुखसिधुसि युक्त अखंडित ते चि स्वयें सुखसागर मूर्ती ॥ २३ ॥ जो निज अंतर आत्मसुखीं रिझला मग ही न च घे विषयासी ॥ तेथ च अंतर ज्योतिस लक्षित ब्रह्मलयात्मक ध्यान जयासी ॥ पाउनि ब्रह्मपदी परब्रह्म चि होउनि ब्रह्मसुखी सुखवासी ॥ काय किती सुख ते वदणे सुखमात्र चि ये न कदां वचनासी ॥२४॥ यास्तव ने समदार्शि ऋषीश्वर याविषयी क्षिणकल्मष जाले ॥ सांडुनि संशय बुद्धिमनादिक साम्य सुखें मनिं पूर्ण निवाले । सर्व भुती हित ईश्वर जाणनि होउनियां पर तेथ च ठेले ॥ ते लभले अविनाश परात्पर ब्रह्म परा मुळ तेथ न चाले ॥ २५ ॥ क्रोध कॉमा जिहिं टाकनियां निज कर्मसमर्पण ब्रह्निं च कीजे ॥ ज्ञानपदी समचित्त निरोधनि ते इति सप्त समाधि सुसेजे ॥ या उभयांसि हि ब्रह्म चि आश्रय वर्तति ब्रह्मसुखे सुखभोजे ॥ यावरि आइक आणिक देह परी तरि काळ कसा कमिती जे ॥२६॥ यावरि अंतरज्योतिस लक्षित योग असे कथिले पहिले ॥ आयिकता तरि त्यागुनियां विषयास मनी मन संयमिले ॥ अर्धविमीलन नेत्र भ्रमध्य धरी निज दृष्टिस आवारल ।। रचक पूरक सांवरुनी सह नासिक कुंभक स्थीराविले ॥ २७ ॥ ते चि स्थळी मन बाद निरोधान तो मनि मोक्ष परायण जाला ॥ काम नसे भय क्रोध नसे परिपूर्ण सुखे निज अंतरि धाला ॥ अंतर बाहिर ब्रह्मचि होउनि ताप तिन्ही शमऊनि निवाला ॥ काय म्हणों मग आठविली सख जीवनमक्त हे नाम तयाला ॥ २८ ॥ यज्ञतपादिमुखे यजिती तरि ते तपयज्ञविनिश्चयभोक्ता ॥ सर्व हि लोकमहेश्वर मी निगमे नियमी निगमागमवक्ता ॥ सुहृद सर्व भुतां हृदयीं वसतो अणच्या कणिका पण रिक्ता ॥ नाहि तयापरि जाणत जो मग शांति तया वरिली निजभक्ता ॥ २९ ॥ इति पंचमोऽध्यायः १ अग्नि. २ गतपाप. ३ निद्रित. वेदशास्त्र. हे सूक्ष्मरज. ७ कण. योगशास्त्र प्रसिद्ध वायु निरोधादि प्रकार. ५