पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामन पंडित. कातरि जो निज तत्व विचारूनि किंचित मी करिता न मनीची ॥ पाहतस रुप ऐकत शब्द करी मृदु शीतळ घष्टि त्वचेची ॥ पाणसुखा सरसी रसना पद वीचैरताति क्रिया गमनाची ॥८॥ माणसुखीं उससी* न अहेर्निशि वाणि न वाणि वदे अति सैरा ॥ आणि करी मळमूत्रविसर्ग हि पीयु प्रजापत्ति इंद्रियद्वारा ॥ हात अदानक्रियाग्रहणादि लवे लवती निज नेत्र थरारा ॥ वतेतसे सकाळंद्रिय निष्फळ ब्रह्मपदी समबद्धिस थारा ॥९॥ ब्रह्मसमर्पण कर्म करी फळसंग नसे निरहंकृति जो कां ॥ आवडिपूर्वक आचरतां निज देखत दाखवितो बहु लोकां ॥ सुकृत पाप घडे जग भोगति स्वर्ग अधोगति नेणत तो कां ।। नवि जळी जळसंभव पत्रजळा न शिव सम या अवलोका ।। १०॥ स्नानदानविधि नित्य निमित्तिक ईश्वरध्यान मने करिताहे ॥ बुद्धिस निश्चय तत्त्व अनुभव ब्रह्मसमाधिसुखें जग पाहे ।। कातन नतन उत्तम संगत्यजी किमपी फळ हेत न चाहे ।। योगि असा निरहंकृतिने करि कर्म दिसे परि केवळ देहे ॥ ११॥ जो परमेश्वर अर्पण कर्म करी फळ त्या न उरे चि स्वभावे ॥ जो निज मोक्षसखाप्रति पावत नैष्ठिके शांत तयास म्हणावें ॥ कर्म करी परि जो न बहिर्मुख मी करिता फळ हे मज व्हावे ॥ आस धरी विषयी जन कामुक जंपियला भवसंकटिं भोवे ॥ १२ ॥ साख्य मताहुनि योग विशेष तुते कथिला तरि या परि साचा ।। याहुनि ज्ञान विशेष हि आइक कर्मविसर्जन ब्रह्मि तयाचा ।। आत्मरुपी मन होउनि उन्मन राहतसे सदनी स्वसुखाचा ॥ देह पुरी नवद्वारमया करिना करिना न च तो करणाचा ॥ १३ ॥ ते अकृतत्व कसे तरि ईश्वरस्वानुभवे निज ठाथि पडे ॥ जो अविनाश अनामय त्या जगमारकता गुण नावघडे ।। है जग तो न करी करवी न हि कर्म फळी फळसंग उडे । जेवि रखी मृगतोय स्वभाविक होय तया जळिं तो न बुडे ॥ १४ ॥ त्या विभुते कृत कर्म शुभाशुभ अर्पनियां अणुमात्र भजेना ।। कर्म अहंकृतिने करिती अति भोगिति ते सुखदुःख हि नाना । १ घर्षण.२ कातडी. ३ आचरतात. ४ कार्य. * लोभ, ५ रात्रंदिवस.६ स्वच्छ ७ त्याग. गुद. ९ शिक्ष. ११ नाचणे. १२ ज्ञानी.१३ ज्याची हारी बाह्य वस्तूकडे मात्र असते.१४ ग्रह.१५ नगरी.१६रोगराहत.१७मगजल. १८ प्रभु.