पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गीता-अध्याय ५. गीता अध्याय ५ वा.] यावार अर्जुन पूसतसे हरि सर्व हि कर्म समनि ज्ञानी ॥ था असिने वधि संशय सांगसि आणि पुन्हा करि कर्म निदानी॥ या उभयांतुन एक कथीं मज उत्तम कोण जे ते चि मि मानी। ते चि सुखे अचरोनि सुटेन तुझ्या वचने भवसांकडिहानी ॥ देव ह्मणे तुज संशय जो निज बंधुवधार्थ मनी भरला ॥ तो निरसो म्हण ज्ञान तुते उपदेशुनि ईश्वर दाखविला ॥ साधन ज्ञान निमित्त स्वकर्म प्रतिष्ठुनि कर्म चि ब्रह्म तुला ॥ सांगितले तरि निश्चयपूर्वक जाणुनि आचर कर्म भला ॥२॥ कां तरि जो निज कर्म अनष्ठनि सर्व हि अर्पितसे भगवंतीं । कर्मफळी निरहंकात होउनि द्वेष न कांक्षि न द्वंद्व समाप्ती ॥ बंधन त्याज न बाधि महाभुज पूर्णसुखे सुख अक्षय प्राप्ती ।। जाणसि ज्ञान हि योगिं च तो करिजेत विचार असा बहु संती॥३ आचरतां निज कर्म सुनिर्मळ चित्त वरी शुभ मोक्षपदासी ।। कर्म करी परमेश्वर अर्पण ज्ञाननिधी वरि त्याच सुखासी ॥ ज्ञान स्वकर्म उभी फळ एक चि जाणति पंडित या उभयासी ।। भिन्न तयां ह्मणती नरमढ अतीशय तो म्हण बाळ तयासी ॥ सांख्यमते उपजे निज ज्ञान अनुभव पाववि मोक्षपदासी॥ कर्म करी परब्रह्म समर्पण हा मिळतो पथ योग हि त्यासी ॥ सांख्य स्वकर्म पहा फळ एक च आचर त्या निरुपाधि विदोमी दो चरणी मति दोचरणीं श्रुति हे यासि तसे ते हि पहासी ॥ योग नको मुळ कर्म च टाकून होइल मोक्ष कधी न घडे ॥ मोडुनि अंकुर जो फळ इच्छिल लाभ तया वद काय घडे ॥ कर्म करी परमेश्वर अर्पण. ज्ञान तया उघडे उघडे ॥ पावन शीघ्र सुखास मुनी न च ब्रह्मपदाहानि तो विघडे ॥ ईश्वर अर्पण कर्म घडे तरि चित्त सुनिर्मळ स्वानुभवे ॥ संभव ब्रह्म समस्त हि भूत समुच्चय ब्रह्म चि हा बरवे ॥ चितुनियां मन इंद्रिय निग्रह ब्रह्मपरायण तो विभवे ॥ जाणनियां जनसंग्रह कारण कर्म करी परि बंध नव्हे ॥ युक्त समस्तहि कर्म समर्पण ब्रह्म अनूभवि बद्ध नव्हेची ॥ खड़. २ संकट,