पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनन्दतनयकृत. पाटीर हेममय वाटीत घे विनय ताटी फळे फुल जळे । हाटी च रत्नमय पाटी मुनीस परिपाटी पुजी करतळे ॥ दाटी सहीत अग्रवाटी अणूनि च ललाटी पुजी करतटीं । थाटी च ये स्तुति च साठी उदारतर भाटी च भूप निकटीं ॥ ६ ॥ चूर्णिका. त्या नंतर वदनाभिराम वदनारविंद-विलोकनपरिपूर्ण-मनोरथ, राय दशरथ कर्पूर-कुसुम-सुगंध-गंधाक्षत-केसरादि परिमल-द्रव्य, नाना-मुक्ताफलादि सुवर्ण द्रव्य, परम पवित्र विचित्र-चरित्र विश्वामित्र षोडशोपचारे पूजिला ॥ ७ ॥ जोडोनि करतल, सुरसरिता-जल-विमलहृदय अजतनय सविनय पुसे काय आज्ञा, अगा हे मुनिकुलप्राज्ञा, भूतभविष्यवतमान-त्रिकालज्ञा, निगमागम सारपारज्ञा, जीजी सकल-राज-संभार-अगणित-तुंग-तुरंग-मत्त-मातंग-सौधे-मंडित चतुःसमुद्रवलयांकित भूमी, हा विषय आपुला नी स्वामी, मज दासाप्रत सांप्रत मनोरथ प्रकटिजे ॥ ८ ॥ दिंडी.. ऐक राया सौभाग्य-घनाकाशा । अम्हा काशासी दारधनी आशा ॥ काय योगी गुंतती मोहपाशा । जिहीं वरिल्या संपत्ति अवीनाशा ॥९॥ सौध सने आम्हांसि पर्णशाळा । स्फटिक रुद्राक्षा मुंक्त-मणी-माळा ॥ भस्म अंगी पाटीर योगियाला । उणे केवीं वैराग्य-वैभवाला ॥ १० ॥ ऐक माझा वृत्तांत महीपाला । राक्षसांचा यज्ञांत उठे पालों ॥ विघ्न करिती मोडून यज्ञशाला । येथ आलो यालागि धी-विशाळा ॥१२॥ या रक्षाया दक्ष तुझी बाळे । राक्षसांते शासिती बाणजाले ॥ यागसिद्धी होईल शीघकाळे । ऋषी होती संतुष्ट अळमाळें ॥ १२ ॥ करूं शिकतिल त्वत्तनय ससंग्रामा ।कीर्ति शोभा येईल रामग्रामा ॥ पुन्हा येतो घेऊनि राम ग्रोमा । पर्णकामा कल्याण गुणग्रामो ॥ १३ ॥ पुत्र द्यावा हा शव पडे कानीं । खेद मोठा भपाळ मनीं मानी॥ शन्य मानी त्रैलोक्य राजधानी । काय मागा हे थोर गमे हानी ॥ १४ ॥ तपे केली निःपाप मुलां साठीं। म्यां हि संवत्सर सहस्र शते साठी ॥ गुणी योजू नेणती चापकोटी । राक्षसांशी भांडतां लक्षकोटी ॥ १५ ॥ ह्मणे जी जी सर्वज्ञ तपोरासी । कसे देऊं या सांग किशोरासी ॥ नाहि केला अभ्यास धनुष्याचा । मार्ग नेणे की मंत्र रहस्याचा ॥१६॥ १ चंदन. २ दशरथ. ३ बेद-शास्त्र. ४ हत्ती. ५ गची. ६ गृह. ७ मोती. चंदनः ९ समह.१० बुद्धि, ११ गांव. १२ समह, १३, दोरी, १४ बालक.