पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवदगीता-३. जे प्रकृतीपे कर्म पुरातन वर्णविभाग विभागुन वेदें ॥ स्थापियले करिजे ते अगत्य चि श्रेयसुखादिक जोडुनियां दे ।। आचरतां परधर्म न ये जरि स्वप्न परीगृहिं जागृति नांदे ॥ मृत बरॉ निज धर्मरता परधर्मरता पडतो भवद्वद्वे ।। ३५ ।। अर्जुन वीनवितो हरि ये विषयों मज संशय वारुनि सांगे ॥ पाप घडे परधर्मरता तरि दाटुनि कां नर तेथ चि लागे । जाणुनियां पथ कूपथ हा परि आवघडी पडिल्या वरि भंगे ।। दुःख न इच्छित त्यास बळे भटकावित नेउनि कोण विजांगें ॥३६।। देव म्हणे पुसिले तरि आइक जो रजसंभव काम म्हणावा ।। आणि दुजा "अरि जाण तेीनुज क्रोध हि दुर्जन दुष्ट गणावा ।। या उभयां न पुरे भुवनत्रय दुर्घट मानवराक्षसदेवां ।। ते आति पातकि घोर भयानक घातक सात्विक लोक वदे वा ॥ ३७ ।। वन्हि अगोधर धूर निघे मळ सांडुनि सोज्वळ दर्पण पाहा ।। उल्ब तया विण गर्भ नसे कणभस समागम लाग तसा हा ।। तंदुळ तूष विना न घडे जड शुक्तिपुंटे विण मौक्तिकाहा ।। तेवि च हे जग आंवरिले' मुळिहूनि कसे चुकतील अहाँहो ॥ ३८ ॥ इंधन जो जो पडे अधिकाधिक वन्हि धडाडितसे प्रबळे ॥ इंद्रपदादिक पाउनि काम नव्हे पुरता पुढती खवळे ॥ हा रिपु ज्ञानिजना करि अज्ञ धनंजय ! आवरितो स्वबळे ॥ जेवि धुळी भरली बुबुळे मग रात्र दिवा कशि त्यास कळे ।। ३९ ॥ बुद्धि सुखासन आसन हे मन इंद्रियवाहक काम वसे हो । हिंडतसे बहु ते विषयीं तव त्या विण आणिक गोड नसे हो ॥ सौख्य कधी कधिं दुःख हि भाोगत शोक विना अन लाभ नसे हो ।। ज्ञान बुडे अभिमान चढे करि मोह जना अविचारिपिसे हो ॥ ४० ॥ यास्तव हाँ जंव मोह न पाववि तो करिं इंद्रियनेम विरेशा ।। लावुनिया भगवद्भजनी मन बुद्धिस चिंतुनि ठेविं परेशा ।। जी प्रतिकूळ सदां स्वहिता प्रति पापरुपी भरली बहु आशा ।। २१ प्रकृतीपर स्वाभाविक. २५ अरि=शत्रु. २६ तदानुज त्याचा (काम) धाकटा भाऊ. २७ उल्ब नाळ; मल उपजते त्या वेळी त्याचे सभोंवती असणारे वेष्टण. २८ तुष कोंडा. २९ शुक्ति-पुट-शिपीचे पूड. ३० मौक्तिक-लाहा मोत्याचा लाभ. ३१ आंवरिलें वेष्टिले. ३२ अहाहा खेदोद्गार; हाय हाय. ३३ इंधन-सर्पण. ३४ अन= आन (अन्य ). ३५ पिसे वेड. ३६ हा काम. ३७ विरेशा ( वीरेशा )==वीर-श्रेष्ठा.