पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-३. (४१) देखिसि दाविसि धर्मपरायण औन जगी न दिसे तुजेसारे ।। वृद्धपरंपरस्थापक आइक होशिल आग्रह येथ नको रे ॥ २१ ॥ जाणसि अर्जुन मी पुरुषोत्तम आणिक थार नसे त्रयलोकी । सर्व हि हे जग म्यांस्रजिले मन अर्पित कर्म समस्त हि ये की । काय उणे मज श्री मज आधिन हे सुर पाईंक इच्छित हे की । पोळुनि विधान हि कर्मज होउन बद्धक जीवित झांकी ॥ २२ ॥ मी हि कदाचित पूर्ण म्हणोनि च कर्म जरी न करी अळसाने । लोक तसे परि आधि च आळशि आश्रय त्या वरि होइल याने ॥ मी करितो तरि हे करिती गिळिं अग्नि धरी गिरि जो किं नखाने ।। ते हि नव्हे परि कर्म च टाकुन जारण चोर पहा विधि माने ॥ २३ ॥ कर्म स्वभाविक मी न करी तरि सर्व हि लोक तसे करिताती ।। तेने प्रजा मलिनी मग होतिल वर्णकुळाचरणा न धरीती ॥ संकरवर्ण तया म्हणिजे जनि लोपति धर्म पुरातन रीती ॥ हे करणे मन येइल यास्तव आचरतों जनसंग्रहरीती ॥ २४ ॥ कर्मफळी धरि आस जसा करि कर्म अगत्य च कर्मठ जाने ।। हे भरतोत्तम! ते चि परी करि मुक्त स्वभाविक कोडिस वाने ॥ आस फळी न धरी निरहंकृति काय प्रयोजन त्या करण्याने ॥ देखत देखत आचरती जनसंग्रह कारण वर्तन तेणे ॥ २५ ॥ कर्मफळी बहु आदर सादर त्या प्रति आपण कर्म कथावे ॥ ज्ञान तया कथिले तरि निश्चय येऊन बुद्धिस सिद्धि न पावे ॥ ज्ञान नसे धड कर्म नसे धड यापरिचे नेड कां श्रमवावे ॥ सुज्ञ तयांनि हि यज्ञ सुलक्षण दीक्षित होउनियां अचरावे ॥ २६ ॥ प्राकृत कर्मगुणे क्रियमाण तसी करणे निज वर्तात कीं ॥ नेणुनि हे अहंकार वसे नसतां चि म्हणे करितों सकळा मी ।। बुद्धिहिना प्रति कोण करी उपदेश तया म्हण कर्म च नेमी ॥ सज्जन आपण आचरतो पण मुक्त कसा कायजेल सुवर्मी ॥ २७ ॥ तत्त्व जया कळले गुणकर्म विचारुनि आत्मपणे अपणा ॥ जाणतसे निज निर्गुण अक्रिय पूर्ण परात्पर आत्मखुणा ॥ ९१ आन अन्य (दुसरें.) ९२ तुजसारे तुझ्यासारखें. ९३ स्रजिलें निर्मिलें. ९४ पाइक-चाकर. ९५ या चरणांत दोन अक्षरें कमी आहेत. ९६ गिळिं याचा कर्ता मी. २७ गिरि-गोवर्धन पर्वत. ९८ तेन तेणेकरून. ९९ मलिना-पापी. १०० वर्ण-जाति, रंग. १ संकरवर्ण-वर्णसंकर जातींची मिसळ. २ जड मूढ. ३ करण=इंद्रिय. १ विचारुनी विचार करून.