पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिघनकृत. मेघ पडे तरि अन्न हि जन्मत तो वरषे सुरयज्ञ वसे ।। यज्ञसमुद्भव कर्मक्रियस्तव ज्यास क्रतू म्हणिजेत असे ।। १४ ।। कर्मविधी वहिली निगमें तरि ब्रह्म तया म्हणिजे निगमाते । वेद हि तेथुन उद्भवती मुळ अर्क्षर ते अभिधान तयाचें ।। अक्षर ब्रह्म समुद्भव विश्व दिसे बुझ ब्रह्म चि सर्वगताते ॥ यास्तव अर्जन जाणसि की रुप यज्ञ अखंडित नित्य क्रियते ॥ १५ ।। कर्म दमार्थ करी तरि हे जलवृष्टि करी बहु अन्न भुताते ।। चक्र पुरातन हे भंवते अनुवर्तति जाण त्या परिज्ञाते ।। इंद्रियसौख्यनिमित्य च वर्तति अर्पिति अन्नव अग्निद्विजाते ।। जीवित जन्मुनि निर्फळ निर्फळ भोगिति ते बहु पाप तयाते ।। १६ ।। मानव जे निज आत्मरती भगवत्पर कर्म करीती ॥ तृप्त सदा निज आत्मसुखें राति स्वानुभवे रचिले डुलताती ।। आत्मपर्ण सम तुष्ट अहर्निशि भोगविती ममता न धरीती ।। कार्य नसे उरले अणु त्यां प्रति जन्मति नाचि कदा न मरेती ।। १७ ।। त्या पुरुष करितां निज कर्म हि ब्रह्मस्वरूपक कृत्य असेना ॥ आणि जरी न करी दषण भूषण पाहत कांहिं दिसेना ॥ का माण तरि तो निरहंकात ज्या न विधी अवधी अडकेना ॥ सन भुत अविनाश विलोकनि आश्रय यास्तव मोक्ष धरीना ॥ १८ ॥ पास्तव तूं फळसंगविवर्जित नित्य निमित्य सखे अचरें ।। ते निज कर्मक बद्ध न होशिल संग समस्त सुखें विसरे ।। जो निरहंकृति होउनियां स्थिर इंद्रियज्ञानसुखे विचरे ।। या परि पावन ब्रह्मपदी परमोत्तम सदगति त्या चि नरे ॥ १९ ॥ कमफळ कल अंतर शुद्ध जरी निज ज्ञान चढे शुभ हाता ॥ जाण तरी निज कर्म अवश्यक त्याग नव्हे जनकादि महंता ।। आपण पाहुनियां पर पारे जशी मग सांगड वाहत माथां ।। त्या वरि आणिक ही जन ये उतरोनि तसे करि कर्म चि पार्था ।। २० । श्रेष्ठ सुधी विधि आचरती तरि पाहुनि वर्तति हे जन सारे । का तरि तो पथ मानुनि चालसि अर्जुन तूं जरि त्या च विचारें ।। ८३ तोमेघ ८४ वरषे=वर्षे ( वृष्टि करितो ). ८५ समुद्भव= उत्पत्ति. ८६ अक्षर अविनाश. ८७ या चरणांत तीन अक्षरें कमी आहेत. ८८ या चरणांत दोन अक्षरें कमी आहेत. ८९ पार तीर. ९० अर्जुन हे अर्जुना.