पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-३. (३९) जाणुनियां सहजस्छितिचे निज कर्म करी फलहेतु न कल्पी ।। दांभिक त्याहुनि हा परमोत्तम योगविशेषणसक्त स्वरूपी ।। ७ ।। टाकिशि कर्म तयाहुनि आधिक नीयत कर्म करी धनुपाणी ।। ते तुज भाग विशेशिल ते कशि जाण उपेक्षिसि तूं श्रुतिवाणी ।। सर्व हि कर्म चि सोडून देशिल तैं भुकताहन त्यांत च आणी ।। देह चि जाइल मोक्ष अकर्मण कोण प्रसिद्धिल निश्चित हानी ॥ ८ ॥ कर्म करी तुन यज्ञनिमित्य असे वदलो तरि आइक आतां ॥ यज्ञ च विष्णु इती वदते श्रुति त्याविण बंध जना प्रति पार्था ।। विष्णु मिषे मज आपण होइल चूकउनी भवताप अघाता ।। सांडुनियां फळ संग सुखे निज आचर टाकुनि सर्व अहंता ॥ ९ ॥ ये विषयों सृजिले जग तें सहयज्ञ प्रजापति सांगत धाता ।। हा चि तुम्हां निज धर्म प्रुप देव-तरू-फळ होइल दाता ।। इच्छित ते प्रसवेल अशी सुरधेनु उभी स्वतसिद्ध समस्तां ।।। सांडुनि काय करा उतरा भव कोण गती न कळे मज आतां ॥ १० ॥ वायु रवी शशि सोम असे सुर तुष्टति सर्व हि यज्ञविभागें ।। भोजविती जन त्यां अनुमोदन चिंतित पुरविताति निजांगे ॥ भावत प्रीत परस्पर सांकडि कांहिं नुरे निज कर्म प्रसंगे ॥ अंतर निर्मळ होइल पुण्य पिके पुढिलां प्रति देख हि लागे ॥ ११ ॥ भावित यज्ञमुखे सुर देतिल सर्व हि इच्छित भोग जरी ।। ते चि पुन्हा द्विज अग्नि न हवी ममते निज स्वार्थ धरी ॥ जो सुरपाळक विश्वविभावन क्षोभत सर्व हि भोग हरी ।। चोर जसा करिं सांपडला कुटतील तया परि दंड करी ॥ १२ ।। तोषनियां सुर सर्व हि संपति मागितली भजकां प्रति देती ।। ते करि यज्ञसमर्पण ब्राह्मणअग्निमुखे जगदीश्वरतृप्ती ।। दोषविवर्जित शेष उरे मग जविती घेउनि स्त्रीसुत पंक्ती ।। भोगिति पाप सदां सुर भूसुर वंचुनि आपण रांधुन खाती ।। १३ ॥ वर्णन हे हरि आद्य कथा मग सांगतसे जग-चक्र कसे ॥ अन्न तयास्तव शोणित शुलित मीळत पावत भूतदशे ।। ७३ धनुपाणी हे धनुर्धराः ७४ श्रुतिवाणी-वेद-वचन. ७५ कत् ( ऋतु )=यक्ष. ७६ देवतरू (तरु ) कल्पवृक्ष. ७७ भावत आवडते; मानवते. ७८ या चरणांत दोन अक्षरे कमी आहेत. ७९ तेती (संपति) ८० भसुर भूदेव (ब्राह्मण) ८१ शोणित-रक्त. ८२ शुलित रेत.