पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८) उद्धवचिद्घनकृत. देह-पुरीत घडीभर तो नसतो जंव देह पडे अवसानी ।। ब्रह्मपरायण तो परब्रह्मचि साकरसेदु कडू झणि मानी ।। ७२ ॥ द्वितीयोऽध्यायः समाप्तः अध्याय ३ रा. अजून वीनवितोहे असे मत निश्चित मानतसे मज आतां । कर्म तयाहुनि बुद्धि विशेष तुवां कथिले बरवे यदुनाथा ॥ हे असतां तरि ऊठवल्या करि घे धनु जोडुनि वोढनि कुंता ।। हिंसक कर्म करी अति घोर नियोजसि वैर्य उगाचि अनंता ।। १ ।। ज्ञान घडीभरि कर्म घडीभरि सांगासि निश्चित गाष्टिस देवा ! ॥ तैविच चाळवितोसि तथ्य चि बोलसि हे न कळे अनुभावा ।। सावध होउनि मोक्ष वरी मज येक विवेक असा समजावा ॥ ते परिसोनि मि आधिक भ्रांत भ्रमे भुललो न पवे चि विसांवा ।। २ ॥ दव म्हण सुख-प्राप्तिस म्यां च पुरातन हे कथिले पथ दोन्ही ॥ या जनि जो अधिकार वसे निज आचरिजे मग तो च तयानी ।। इद्रियनिग्रह ध्यानउपक्रम आत्मारती मज पावति ज्ञानी ।। ज करिती निज कर्म अवश्यक योगि हि पावति मी च निदानी ॥ ३ ॥ निर्मळ चित्त नव्हे जंव तोवरि जाण अवश्यक कर्म करावे । । कर्म जई न करी च अकर्मण जाणसि तूं कधिं त्यास न व्हावे ।। ज पार अस्त नव्हे उदयाविण की गमनाविण अस्त न पावे ॥ कम जरा फळ ज्ञान न दावि च मोक्ष ससिद्धिस कोठानि पावे ॥ १ ॥ कम जरा न करी म्हणतो तरि कर्म विना क्षण राहं सकेना ।। टाकुन कम नव्हे चि अकर्मण जे करणे व्यवसाय कमेना ॥ पाहात लाचन ऐकति कान करादिक सर्व क्रिया करि नाना ।। आधिन जे प्रकृतीस स्वभाविक ते ते अवश्यक तीस सटेना ॥ ५ ॥ शुद्ध नसे निजध्यान विणे करि आठव नित्य सदा विषयांचा ।। आणिक ही गृहिं तो करणे करकर्मक्रिया चरणादिक वाचा ।। वावरते मन बाहिर रोधन दाखवितो जानं मी नियमाचा ॥ झांकुन लोचन आसन घालन दांभिक जाणवि वेष तयाचा ॥ ६ ॥ इंद्रिये कर्म सुखे करिती परि जो मन नेमित आत्मस्वरूपी ।। जे करिती क्रियमाण करादिक ते अवघे परब्रम्हि समी ।। ७१ साकरसेंदु (?) ७२ या चरणांत एक अक्षर कमी आहे.