पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आनन्दतनयकृत "ताटकावध". चर्णिका. श्रीमत्सूर्यवंश-संभव-भूपाल-मस्तकिंचा मध्य मेरुमणि, दीन-मनोरथसंपत्तिपूरक चिंतामणि, भक्तभयापहारी, शमदम-विलसित-मुनिजन-सदनहदय विहारी, त्रिभुवनजन-सुमतिनयन-प्रतिबद्धकारण, निबिडतर-दुरित-'तिमिर हरावया, परम दुर्मद-रक्षोवृंदाचिया, प्रताप-तपनस्पर्श-मुकुलित-सुरमन-कुमुदावरि ज्योत्स्नोज्जभण कराया, क्षीरार्णवापासुनी, पूर्वदिशोदरीं श्रीराम चंद्रापरी, दशरथ-गुण-समुद्रापासुनी, कौसल्या-गर्भगुहेमाजी अवतरला ॥ १ ॥ नेणो ते विबुंध-विभव-भांडार प्रकटले, की मनोहर मनुजाकृति सहस्त्रकरसहस्र-तेज गोठले, की किसलयसम करकमल रुचिर पद कुवलय-दलनिर्भे नयन युगले, अति मृदु पदतळ झळझळ तळपति, किळ बहुविध-मणिगण-खचित मुकुटतटी, छतपट-विलसित-कटी, सकलिं ही अवयविं नग झगझगिती, मघमघीत विराजिती माळा, ऐशिया श्रीपुरुषोत्तमाला, अंकी घेउनि खेळवी दशरथ भपाळ देव-आगळा, मोक्षासि अटकरूप तुटली पुन्नाम नरकींची अर्गळा, आनंद-समुद्री संक्रीडत घडिघडि रोमांच विमुंभात ॥ २॥ तो कोणेके अवसरी, कनक निकेतनामाझारी, जैसा द्विजगणांमाझारि केळाधरू, की पद्मनी-स्तोमंगणी होय सहस्त्रकरू, की भूभृत् कुली निजंभमाण हेमधेराधरू, दशरथ पृथ्वी-वल्लभ लखलखित सिंहासनारूढ विराजे ॥ ३ ॥ श्लोक. तो आकस्मिक तव्रि सेवक सभा-प्रांती नपा वंदुनी। वार्ता सर्व निवेदिती द्रुतगती गाँधेय आला मुनी ॥ पायीं वाजति पादुका चटचटां आपाद. माथां जटा । वाटे धूर्जटि पातला दशरथे तो देखिला भूतटा ॥४॥ अश्वधाटी. माला करी हृदयभालासि ते भसित ज्याला मृगाजिन कटीं । लोला जटा रुळति डोला परी परम कोलाहल ध्वनि उठी ॥ लीला असी म्हणुनि नीलालका सुकृतशीला तयासि नमिती । आला मुनी निज घराला म्हणूनि मग झाला पुढे नरपती ॥ ५ ॥ अंधकार. २ चांदणे. 3 देव ४ सदृश. ५ प्रकटती. ६. गृह. ७ भांत. ८ चंद्र. ९ समह. १० सूर्य. ११ पर्वल. १२ मेरू. १3 विश्वामित्र. १४ शिव. १५ भस्म. १६ वर्म.